महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Political Leaders Reaction : जितेंद्र आव्हाड यांच्यावरील विनयभंगाच्या आरोपावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया - reaction on Jitendra Awhad allegations

मुंबई : जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढल्या आहेत. महिलेच्या विनयभंगाचा एक गुन्हा देखील त्यांच्यावर दाखल झाला ( Molestation Case On Jitendra Awhad ) आहे. त्यावर अनेक राजकीय नेते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत, त्या पुढीलप्रमाणे (Political Leaders Reaction) आहेत.

Jitendra Awhad
जितेंद्र आव्हाड

By

Published : Nov 14, 2022, 11:34 AM IST

Updated : Nov 14, 2022, 1:47 PM IST

मुंबई :जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढल्या आहेत. महिलेच्या विनयभंगाचा एक गुन्हा देखील त्यांच्यावर दाखल झाला ( Molestation Case On Jitendra Awhad ) आहे. त्यावर अनेक राजकीय नेते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत, त्या पुढीलप्रमाणे (Political Leaders Reaction) आहेत.

अंबादास दानवे :आपण लढवय्ये आहात, राजीनामा देऊ नका या अन्याय विरोधात आपण मिळून लढा देऊ आणि जिंकू सुद्धा, चिंता नसावी, असे ट्विट अंबादास दानवे यांनी करत आव्हाड यांना पाठिंबा दिला आहे.

आशिष शेलार :आव्हाड यांच्या राजीनाम्याचा त्यांच्यावरील आरोपांशी काहीही संबंध नाही. त्यांना राजीनामा द्यायचा असेल तर असू द्या. ती जागाही आम्ही (भाजप) जिंकू,” असे मुंबई भाजपचे प्रमुख आशिष शेलार म्हणाले. (Jitendra Awhad molestation allegations)

अतुळ भातखळकर : एका महीलेच्या दंडाला हात लावून ढकलण्यात आले हे व्हीडीयोमध्ये स्पष्ट दिसतेय. तरीही कांगावा लोकशाही बुडाल्याचा होतोय. अशाप्रकारे गैरवर्तन झाल्यानंतर ती महीला गप्प बसली असती तर लोकशाहीची मान उंचावली असती का?

किरीट सोमैय्या: जितेंद्र आव्हाड आज तथाकथित अन्यायाविरुद्ध ओरडत आहेत. अनंत करमुसे यांचे आव्हाड यांचा पोलिस गुंडांनी केलेले अपहरण, मारहाण, जीव घेण्याचा प्रयत्न, ह्या संबंधात आव्हाड आणि NCP ka गप्प आहेत, असा सवाल किरीट सोमैय्या यांनी केला आहे.

ऋता सावंत (पत्नी) :अंगावर धडकणाऱ्या व्यक्तीला बाजूला करणे गुन्हा असेल तर बाजारात, ट्रेन मध्ये, रेल्वे पुलावर, गर्दीमध्ये रोज शेकड्यांनी ‘विनयभंग’ होत असतील. रीदा रशिद ह्या राजकारणी महत्वाकांक्षा बाळगतात.आणि काल रात्री त्या कुणाला तरी भेटल्या. त्यांच्यावर पण अॅट्रोसिटी चा गुन्हा दाखल झाला आहे. जे काही घडलं ती प्रतिक्रिया होती. त्याला विनयभंग म्हणता येत (reaction on Jitendra Awhad allegations) नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे:राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कळवा मुंब्रा बायपास उद्घाटनाप्रसंगी आपला विनयभंग झाला असल्याची तक्रार एका महिलेने पोलिसात दाखल केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्यावर ही तक्रार दाखल करण्यात आली. मात्र जितेंद्र आव्हाड यांच्यावर केलेली ही कारवाई सूडबुद्धीने केली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला.

Last Updated : Nov 14, 2022, 1:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details