महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाराष्ट्रातील राजकीय 'भूकंपा'नंतर सोशल मीडियावर पाहा कोण काय म्हणाले...

अनपेक्षितरित्या एका रात्रीत महाराष्ट्रात सत्तेच्या घडामोडी घडल्या आणि देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र, शरद पवारांनी अजित पवारांच्या कृतीला राष्ट्रवादीचा पाठिंबा नसल्याचे सांगितले आहे.

देवेंद्र फडणवीस

By

Published : Nov 23, 2019, 10:29 AM IST

Updated : Nov 23, 2019, 12:30 PM IST

नवी दिल्ली - अनपेक्षितरित्या एका रात्रीत महाराष्ट्रात सत्तेच्या घडामोडी घडल्या आणि देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र, शरद पवारांनी अजित पवारांच्या कृतीला राष्ट्रवादीचा पाठिंबा नसल्याचे सांगितले आहे. यावर काँग्रेसचीही पहिली प्रतिक्रिया आली आहे. काँग्रेसने भाजपच्या या कृतीला लोकशाहीची सुपारी म्हटले आहे.

सुप्रिया सुळेंचे व्हॉट्सअप स्टेटस

* पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोघांना शुभेच्छा देताना, मला विश्वास आहे की ते महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी परिश्रमपूर्वक काम करतील, असे म्हटले आहे.

* केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचे अभिनंदन केले आहे. मला खात्री आहे की, तुमच्या वचनबद्धतेने आणि समर्पणाने तुम्ही लोकांची सेवा करत रहाल.

* स्मृती इराणी यांनी यांनी फडणवीसांचे कौतुक करत मी पुन्हा आलो असे म्हणत व्हिडिओ शेअर केला आहे.

* संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, मला खात्री आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याच्या प्रगती व समृद्धीसाठी संयुक्तपणे काम करतील.

* भाजप नेते एकनाथ खडसेंनी केले देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन..

* काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी हा जनादेशासोबत विश्वासघात असून लोकशाहीची सुपारी घेतल्याचे म्हटले आहे.

* अजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचे शरद पवारांनी ट्विट करून सांगितले.

* केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना शुभेच्छा दिल्या.

* भाजपला जनादेश होता त्याचा सन्मान झाला - पंकजा मुंडे

* चित्रा वाघ यांनी अजित पवारांना पाठिंबा देताना, दादा,मनःपुर्वक अभिनंदन,योग्य वेळी योग्य निर्णय, असे म्हटले आहे.

* केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना शुभेच्छा दिल्या.

* केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी, सौ सोनार की एक लोहार की असे म्हणत अभिनंदन केले आहे.

Last Updated : Nov 23, 2019, 12:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details