मुंबई - दिव्यांश प्रकरणी पी-दक्षिण पालिकेच्या सहायक आयुक्तांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी मंगळवारी गोरेगावातील सर्वपक्षीय नेत्यांनी मोर्चा काढला. या मोर्च्यात मनसे, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
दिव्यांशप्रकरणी गोरेगावात सर्वपक्षीय नेत्यांनी काढला मोर्चा
दिव्यांश प्रकरणी पी-दक्षिण पालिकेच्या सहायक आयुक्तांनी राजीनामा द्यावा अशी, मागणी गोरेगावातील सर्वपक्षीय नेत्यांनी केली आहे. त्याचबरोर पालिकेने उघड्या गटारींना झाकन लावण्याचीही मागणी यावेळी नेत्यांकडून करण्यात आली.
दीड वर्षांचा दिव्यांश गोरेगाव पूर्वेकडील आंबेडकर चौक परिसरातील नाल्यात पडून बेपत्ता झाला होता. या घटनेला आठवडा उलटला. मात्र, अद्याप त्याचा शोध लागला नाही. सोमवारी या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात कलम ३०४ (अ ) अंतर्गत गुन्हा नोंदवला होता. मात्र, दिव्यांश प्रकरणी पी-दक्षिण पालिकेच्या सहायक आयुक्तांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी गोरेगावातील सर्वपक्षीय नेत्यांनी केली आहे. त्याचबरोर पालिकेने उघड्या गटारींना झाकण लावण्याचीही मागणी यावेळी नेत्यांकडून करण्यात आली आहे. गोरेगाव पश्चिमेकडील एम.जी रोड ते एस.व्ही. रोड पी-दक्षिण पालिका कार्यलयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता.