महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Fight in Shinde Group : होळीच्या दिवशी ठाण्यात ठाकरे, शिंदे गटात राजकीय धुळवड, शाखांचा वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे - Dispute of branches signs of rekindling

होळीच्या दिवशीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये पुन्हा एकदा शिवसेनेच्या शाखेवरुन वाद ऐरणीवर आला आहे. शाखा ताब्यात घेण्यावरून दोन्ही गट एकमेकांना भिडले. दोन्ही गटांकडून यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. एकनाथ शिंदे यांनी आम्हाला ठाकरेंच्या कोणत्याही प्राॅपर्टित रस नाही असे विधान केल्यावर थांबलेला वाद या निमित्ताने पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत.

Fight in Shinde Group
शिंदे गटात राजकीय धुळवड

By

Published : Mar 7, 2023, 1:38 PM IST

Updated : Mar 11, 2023, 4:20 PM IST

ठाकरे-शिंदे गटात धुळवड

मुंबई :शिवसेना नाव आणि चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला बहाल केल्यानंतर शाखा आणि कार्यालयांवरून वाद सुरु झाले आहेत. ठाण्यातील शिवाईनगरमधील जुनी शाखा ताब्यात घेण्यावरुन होळीच्या पहिल्याच दिवशी शिंदे गट आणि ठाकरे गट आमने - सामने आले. बंद शाखेचे टाळे तोडून शिंदे गटाकडून शाखा बळकावल्याचा प्रयत्न केला, असा ठाकरे गटाचा आरोप आहे. मात्र या प्रकारामुळे त्याठिकाणी तणावाचे वातावरण झाले होते पोलिसांनी वेळईट हस्तक्षेप करत वाद आटोक्यात आणला

वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे :एकनाथ शिंदे गटाला शिवसेनेचे नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मालमत्तांचे काय असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी ठिकठिकाणी असाच संघर्ष उध्दभवू लागला होता त्यावेळी खुद्द एकनाथ शिंदे यांनी आम्हाला ठाकरे गटाच्या कोणत्याही मालमत्ते बद्दल कोणताही रस नाही. आमचा लढा त्यासाठी नाही अशा आषयाचे विधान केले होते त्या नंतर हा वाद शमला होता. त्यानंतर हा वाद सध्या चिघळणार नाही असे वाटत असतानाच मुख्यमंत्र्यांच्याच ठाण्यात हा प्रकार घडल्यामुळे हा वाज पुन्हा पेटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


कायदा सुव्यवस्था राखा :गेल्या ३५ वर्षांपासून शिवाईनगर येथे शिवसेनेची शाखा कार्यरत आहे. शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर येथील अनेक शाखांवर शिंदे गटाकडून दावा केला जातो आहे. सोमवारी मध्यरात्री देखील येथील शाखेवरुन झालेल्या वादामुळे परिसरात एकच तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करुन परिस्थिती हाताळली. तसेच कायदा आणि सुव्यस्था बिघडू नये, यासाठी या भागात जमावबंदीचे आदेश लागू केले होते.



तोपर्यंत पोलिसांनी कब्जा करावा :सर्वोच्च न्यायालयात सत्तासंर्घष आणि शिवसेनेचे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. तरीही शिंदे गटाकडून शिवसेनेच्या शाखा कार्यालयांवर कब्जा करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. न्यायालयाने कोणतेही आदेश दिलेले नाहीत. तरीही शिंदे गटाकडून टाळे तोडण्याचा प्रयत्न झाला. त्याना हा हक्क कोणी दिला, असा प्रश्न ठाकरे गटाने पोलिसांना विचारला. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. असेच सुरु राहिल्यास राज्यातील लोकशाही संपुष्टात येईल, अशी भीती ठाकरे गटाने व्यक्त केली. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापर्यंत शिवाईनगरची शाखा पोलिसांनी ताब्यात घ्यावी, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली.


दुसरी शाखा बांधावी - नरेश म्हस्के :स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्या ताब्यात शिवाईनगर येथील शाखा आहे. अनेक वर्षे येथून काम करतात. आता ठाकरे गटाचे कार्यकर्ते आडकाठी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे. या प्रभागातील सर्व नगरसेवकांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला हौस असेल तर दुसरे कार्यालय बांधण्यासाठी प्रयत्न करावेत. आम्ही ठाकरेंच्या कोणत्याही प्रॉपर्टीवर दावा केलेला नाही. ही शाखा आमची असून आमचाच त्यावर हक्क आहे. असा दावा नरेश म्हस्के यांनी केला आहे.

हेही वाचा :Maharashtra Breaking News : तुम्हाला मी आवडत नसल्यास माझा शिरच्छेद करा-ममता बॅनर्जी

Last Updated : Mar 11, 2023, 4:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details