महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Maharashtra Political Crisis : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'तो' दम; राष्ट्रवादीत पडली उभी फूट - ncp political crisis

पंतप्रधान मोदींनी भोपाळमध्ये 27 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसवर भष्ट्राचाराचा (NCP Political Crisis) आरोप केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसवर सुमारे ७० हजार कोटीच्या घोटाळ्याचा आरोप आहे, असे मोदी म्हणाले होते. त्यांनंतर 5 दिवसांनीच राष्ट्रावादी काँग्रेस पक्षात फुट पडून 40 आमदार भाजपच्या गळाला लागले आहेत. रविवारी महाराष्ट्रात झालेल्या राजकीय भुकंपामागे भाजपचा हात असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह 9 आमदारांनी शिंदे- भाजप सरकारमध्ये सहभागी होत मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

Political Crisis In Maharashtra
Political Crisis In Maharashtra

By

Published : Jul 2, 2023, 7:36 PM IST

Updated : Jul 2, 2023, 8:51 PM IST

पंतप्रधान मोदींचे भाषण

मुंबई :परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर मोदींनी पाटण्यातील विरोधी पक्षांच्या सर्वसाधारण सभेत टीका केली होती. तसेच पंतप्रधान मोदींनी कर्नाटक निवडणुकीबाबत काँग्रेसच्या हमी धोरणाला (NCP Political Crisis) उत्तर दिले होते. देशभरातील भाजप बूथ कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेससह विरोधी पक्षांवर हल्लाबोल केला होता. हे पक्ष भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांची हमी देत आहेत. पण आता मोदींचीही हमी आहे. मी प्रत्येक घोटाळेबाजावर कारवाईची हमी देतो. प्रत्येक दरोडेखोरांवर कारवाईची हमी देतो. ज्यानी गरीबांना लुटले, देशाला लुटले, त्यांच्यावर कारवाई तर होणारच, असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. त्यांनतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडली आहे.

विरोधकांकडून भ्रष्टाचाराची हमी :विरोधकांची भ्रष्टाचाराची हमी असेल तर, मोदीही एक हमी आहे. मोदी सरकार प्रत्येक घोटाळेबाजावर कारवाईची हमी देते. आज कायद्याचे राज्य सुरू आहे. अनेक विरोधक शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर आलेले आहे. गुन्हेगाराला अनेकदा तेच लोक भेटतात ज्यांना तुरुंगात जाण्याची भीती वाटते. तुरुंगातील त्याचे अनुभव जाणून घेण्यासाठी पाटणपेक्षा चांगली जागा कोणती?, होती असा हल्लाबोल मोदींनी केला होता.

20 लाख कोटींहून अधिक घोटाळे:प्रतिस्पर्धी एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. विरोधी पक्षांनी 20 लाख कोटींहून अधिक घोटाळे केले आहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आजकाल एक नवीन शब्द खूप लोकप्रिय होत आहे, हा शब्द हमी आहे. विरोधी पक्ष नेमकी काय हमी देत आहेत? हे जनतेला सांगण्याची जबाबदारी भाजप कार्यकर्त्यांची असल्याचे ते म्हणाले. विरोधी पक्ष लाखो कोटींच्या घोटाळ्यांची हमी देत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. विरोधी पक्षाच्या बैठकीत सहभागी झालेल्या पक्षांचा इतिहास पाहिल्यानंतर लक्षात आले की, या सर्वांनी मिळून घोटाळ्याची हमी दिली आहे, अशी टीका मोदींनी केली होती.

विरोधकांनी केले घोटाळे : विरोधकांनी किमान २० लाख कोटींचे घोटाळे केले आहेत. त्यापैकी एकट्या काँग्रेसचा घोटाळा लाखो कोटींचा आहे. त्यात एक लाख 86 कोटींचा कोळसा घोटाळा, एक लाख 76 हजार कोटींचा 2जी घोटाळा, 70 हजार कोटींचा कॉमनवेल्थ घोटाळा, 10 हजार कोटींचा मनरेगा घोटाळा, कोट्यवधी रुपयांचा घोटाळा यांचा समावेश आहे. काँग्रेसने हेलिकॉप्टरपासून ते मरीनपर्यंत सर्वच क्षेत्रात घोटाळे केले आहेत. राजदचे हजारो कोटींचे घोटाळे आहेत. चारा घोटाळा, पशुसंवर्धन शेड घोटाळे, आरजेडीच्या घोटाळ्यांची लांबलचक यादी, शिक्षा सुनावताना न्यायालयेही थकली. पंतप्रधान म्हणाले की, द्रमुकवर 1.25 लाख कोटींचा घोटाळा, टीएमसीचा 23 लाख कोटींचा घोटाळा, रोझ व्हॅली शिक्षक भरती घोटाळा, गाय तस्करी घोटाळा, शारदा घोटाळा, कोळसा तस्करी घोटाळा, राष्ट्रवादी काँग्रेसवर सुमारे 70 हजारां कोटीच्या घोटाळ्याचा आरोप आहे.

हेही वाचा -Maharashtra Political Crisis : विरोधी पक्षांची आघाडी कमकुवत करण्याचा प्रयत्न?

Last Updated : Jul 2, 2023, 8:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details