मुंबईVivek Bhavsar Criticizes BJP :गोपीचंद पडळकर, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर आणि नितेश राणे असतील यांना पुढे करून भाजपा काय साध्य करू इच्छित आहे हे समजायला मार्ग नाही. ह्या लोकांनी वरिष्ठ नेत्यांवर केलेल्या वक्तव्यामुळे स्वतःची प्रतिमा खाली घेऊन जात असल्याचा प्रश्न निर्माण होत आहे. गोपीचंद पडळकर यांच्या संदर्भात कोणाचंही मत चांगलं नाही. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन अनेकवेळा टीका केली आहे. एकेरी उल्लेख करणे हा त्यांचा स्वभाव आहे. पडळकरांना राजकीय संस्कृती माहीत नाही, राजकारणातील प्रतिष्ठा जपणे हे त्यांना माहीत नाही. त्यांचे शिक्षण किती झाले हे देखील मला माहीत नाही. भाजपाने एकदा त्यांना रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी मध्ये स्पेशल प्रशिक्षण द्यायला हवं. त्यामुळे त्यांना राजकारणात कसं वागायचं ते कळेल. भाजपा स्वतःला या अडचणीतून कसं लांब ठेवणार हे कठीण आहे असं, राजकीय विश्लेषक विवेक भावसार यांनी म्हटलंय.
BJP Leader Controversial Statement : 'वाचाळवीरांमुळं भाजपा अडचणीत' - वाचाळवीरांमुळे भाजपा अडचणीत
Vivek Bhavsar Criticizes BJP : भाजपामध्ये जे काही मोजके वाचाळवीर आहेत, त्यांच्यामुळे पक्षाची प्रतिमा अत्यंत खालावत आहे. त्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar) हे सर्वांत वरच्या स्थानावर आहेत. खरंतर भाजपाला समजायला हवं की त्यांची महाराष्ट्रातील प्रतिमा खराब झालेली आहे. भाजपा एक निष्ठेचा आणि आयडॉलॉजी असलेला पक्ष होता, असे मत राजकीय विश्लेषक विवेक भावसार (Political Analyst Vivek Bhavsar) यांनी मांडले आहे. (NCP Leader Suraj Chavan)
Published : Sep 22, 2023, 6:46 AM IST
जसेच्या तसे उत्तर देऊ :भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर खालच्या स्तरावर जाऊन टीका केल्याने महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट आक्रमक झाले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी आमदार पडळकर यांच्या विरोधात निदर्शने आणि आंदोलनं केली जात आहेत. नितेश राणे यांनी पडळकर यांच्या बाजूने उभे राहायचं ठरवल्यावर याला अजित पवार गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींवर जेव्हा टीका झाली त्या-त्या वेळेस त्यांना समजेल अशा भाषेत त्याचवेळी उत्तर देण्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं ठरवलं आहे. 'नितेश राणे तुम्ही ज्या गोपीचंद पडळकर यांची बाजू घेत आहात. तुम्ही दोघेही एकाच माळेचे मणी आहात. संस्काराची कमतरता महाराष्ट्र वारंवार पाहत आहे,' असे परखड मत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते सूरज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. टीका करत असताना आपली भाषा संविधानिक असावी अशा प्रकारचा सल्ला अजित पवार गटाचे युवा प्रदेशाध्यक्ष आणि प्रवक्ता सूरज चव्हाण यांनी दिला आहे. संविधानिक भाषा कशा प्रकारची असते याविषयी बोलताना चव्हाण म्हणाले की, मंत्री नारायण राणे यांच्या लघु आणि मध्यम उद्योगात आपल्या कार्याचा ठसा उमटू शकले नाहीत. त्यांना समजेल त्या भाषेत उत्तर देण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नेहमीच राहिली आहे, मग ते कोणीही असो आमच्या नेतृत्वावर जेव्हा टीका करेल त्याला जसेच्या तसे उत्तर त्याचवेळी दिले जाईल असा इशारा सूरज चव्हाण यांनी दिला आहे.
फक्त आणि फक्त आरक्षण विषय :धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी मुंबईला महत्त्वाची बैठक बोलावली आहे. धनगर समाजाचे शिष्टमंडळ आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बैठकीसाठी उपस्थित असणार आहेत. गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्यानंतर प्रथमच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गोपीचंद पडळकर आमने-सामने येणार आहेत. काही वेळापूर्वी गोपीचंद पडळकर हे सह्याद्री अतिथीगृह येथे बैठकीसाठी दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केलेल्या टीके संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, आज फक्त आणि फक्त धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय महत्त्वाचा आहे. दुसरा कुठलाही विषय आजच्या घडीला महत्त्वाचा नसल्याचं त्यांनी म्हणत या विषयाला बगल दिली.
हेही वाचा: