महाराष्ट्र

maharashtra

रात्र संचारबंदी- वांद्रे परिसरात चोख पोलीस बंदोबस्त; वाहनांची कसून तपासणी

By

Published : Dec 23, 2020, 10:54 AM IST

मुंबईमध्ये रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीमध्ये महत्वाच्या कामांसाठीच बाहेर पडण्याची मुभा आहे. मात्र, विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

रात्र संचारबंदी- वांद्रे परिसरात चोख पोलीस बंदोबस्त; वाहनांची कसून तपासणी
रात्र संचारबंदी- वांद्रे परिसरात चोख पोलीस बंदोबस्त; वाहनांची कसून तपासणी

मुंबई-राज्यात लागू करण्यात आलेल्या रात्र संचारबंदीच्या अनुशंगाने वांद्रे परिसरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिसरातून ये-जा करणाऱ्या प्रत्येक गाड्यांची कसून तपासणी करण्यात येत आहे.

विनाकारण घराबाहेर निघणाऱ्यांवर कारवाई-

मुंबईमध्ये रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीमध्ये महत्वाच्या कामांसाठीच बाहेर पडण्याची मुभा आहे. मात्र, विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

रात्र संचारबंदी- वांद्रे परिसरात चोख पोलीस बंदोबस्त; वाहनांची कसून तपासणी

सतर्क राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश-

ब्रिटनमध्ये करोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आला आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून महाराष्ट्र सरकारकडून राज्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुरुवातीला या संचारबंदीच्या विरुद्ध होते. मात्र, नाताळ आणि नववर्षानिमित्त होणारी गर्दी टाळण्यासाठी २२ डिसेंबर ते ५ डिसेंबरपर्यंत ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीत नियमांचे काटेकोर पालन करावे आणि सतर्क राहण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेला दिले आहेत.

हेही वाचा-रात्र संचारबंदीचा पहिला दिवस; पाहा मुंबईचा ग्राऊंड रिपोर्ट..

हेही वाचा-जळगावात पारा 10 अंशांवर; जिल्ह्यात हंगामातील निच्चांकी तापमानाची नोंद

ABOUT THE AUTHOR

...view details