मुंबईत विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई; 24 तासात 419 गुन्हे दाखल - mumbai corona latest news
गेल्या चोवीस तासात मुंबईत 419 गुन्हे दाखल करण्यात आलेले असून यामध्ये दक्षिण प्रादेशिक विभागात 54 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत

मुंबई- कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य शासनाकडून लॉकडाऊनचे निर्बंध लावण्यात आलेले आहेत. मुंबई पोलिसांकडून कलम 188 च्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आरोपीच्या विरोधात धडक कारवाई करण्यात येत आहे. गेल्या चोवीस तासात मुंबईत 419 गुन्हे दाखल करण्यात आलेले असून यामध्ये दक्षिण प्रादेशिक विभागात 54 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, मध्य प्रादेशिक विभागात 66 गुन्हे, पूर्व प्रादेशिक विभागात 83 गुन्हे, पश्चिम प्रादेशिक विभागात 112 गुन्हे तर उत्तर प्रदेश विभागात 104 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर गुन्हा दाखल
मुंबई शहरात हॉटेल आस्थापन विहित वेळेपेक्षा अधिक वेळ चालू ठेवण्याच्या संदर्भात 22 गुन्हे गेल्या 24 तासात दाखल करण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्याच्या संदर्भात 69 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या 125 जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून अवैध वाहतूक प्रकरणी 2 तर कोरोना रुग्ण संदर्भात 20 तर इतर प्रकरणात 7 गुन्हे नोंदविण्यात आलेले आहेत.