मुंबई - राज्यात कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत असल्यामुळे शहरातील खासगी टूर ऑपरेटर्सना परदेशात व देशांतर्गत पर्यटकांची ने-आण करण्यास मुंबई पोलिसांकडून बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी कोरोनाचा वाढत असलेला प्रसार रोखण्यासाठी घालण्यात आली असून १५ मार्च ते ३१ मार्च २०२० पर्यंत हे आदेश लागू असणार आहेत.
कोरोना विषाणूच्या प्रभावापासून नागरिकांना सावध करण्यासाठी मुंबईतील प्रत्येक पोलीस ठाण्यात नागरिकांशी पोलिसांकडून संवाद साधला जात आहे. नागरिकांनी योग्य ती काळजी घेत गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, हँडसॅनिटायजरचा वापर यासह मास्क वापरावे या सारख्या सूचना दिल्या जात आहेत. समाज माध्यमांवर पसरणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवता सतर्कता बाळगावी म्हणून मुंबई पोलिसांकडून आवाहन केले जात आहे.