महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Lady PSI Rape Case : पीएसआयचा सहकारी महिला पीएसआयवर बलात्कार; गुन्हा दाखल - Police sub inspector rapes

पोलीस उपनिरीक्षक अनिकेत गुलाबराव शिंदेवर (वय 29 वर्ष) बलात्काराचा गुन्हा दाखल (Rape case filed against Police sub inspector) झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या उपनिरीक्षकाने नाशिक येथे आपली सहकारी महिला पोलीस उप निरीक्षकावर हा अतिप्रसंग (lady PSI Rape Case) केला आहे. PSI Raped Lady PSI Mumbai, Latest news from Mumbai, Mumbai Crime

Lady PSI Rape Case
महिला पोलिस उपनिरीक्षकावर बलात्कार

By

Published : Nov 15, 2022, 3:58 PM IST

नवी मुंबई : नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यात सोमवारी पोलीस उपनिरीक्षक अनिकेत गुलाबराव शिंदेवर (वय 29 वर्ष) बलात्काराचा गुन्हा दाखल (Rape case filed against Police sub inspector) झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या उपनिरीक्षकाने नाशिक येथे आपली सहकारी महिला पोलीस उप निरीक्षकावर हा अतिप्रसंग (lady PSI Rape Case) केला आहे. त्यामुळे पोलीस दलातील महिला कर्मचारी किती सुरक्षित आहेत? हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. 30 वर्षीय पीडित महिलेने काल रबाळे पोलीस ठाण्यात संबंधित आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. PSI Raped Lady PSI Mumbai, Latest news from Mumbai, Mumbai Crime

पीडितेला बदनाम करण्याची धमकी-आरोपी अनिकेतने 2019 ते 22 सप्टेंबर दरम्यान अनेकदा बलात्कार केले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आरोपीने 2019 ते सप्टे 2022 दरम्यान नाशिक येथे पोलीस प्रशिक्षणा दरम्यान पीडितेबरोबर प्रेम संबंध प्रस्थापित करून तिला बदनामी करण्याची धमकी दिली. तसेच लग्नाचे आमिष दाखवून नाशिक शहरातील वेगवेगळ्या लॉजमध्ये, तसेच मुंबई, नागपूर व घणसोली घरोंदा येथील पीडितेच्या राहत्या घरी तिच्यासोबत लगट करून जबरदस्तीने शारिरीक तसेच अनैसर्गिक संबंध स्थापन केले.

पीएसआय विरुद्ध गुन्हा दाखल-आरोपी अनिकेत शिंदे हा मुंबई कालिना परिसरातील समतानगर पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहे. त्याच्या विरोधात कायदेशीर तक्रार दिल्याने भादंवि कलम 376, 376 (2)(n), 377, 354(अ), 354(ड) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नसून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details