महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Police Slapped Doctor : सायन रुग्णालयातील डॉक्टरला पोलीसांकडून मारहाण, माफी मागण्याची मार्डची मागणी

सायन रुग्णालयात (Sion hospital) पोलीसांना माहिती देण्यासाठी गेलेल्या डॉक्टरला उद्धट उत्तर देण्यात आले, तसेच त्याच्या कानाखाली मारण्यात (Police Slapped Doctor) आले. यामुळे संतप्त झालेल्या मार्डच्या डॉक्टरांनी निषेध व्यक्त केला. डॉक्टरला मारहाण करणाऱ्या हवालदाराकडून लेखी माफी मागावी, तसेच त्याच्यावर पुढील कार्यवाही करण्याची मागणी मार्डच्यावतीने करण्यात (mard demands apology) आली.

Sion hospital
सायन रुग्णालय

By

Published : Dec 15, 2022, 10:51 AM IST

मुंबई :सायन रुग्णालयात (Sion hospital) तीन महिन्यापूर्वी एका रुग्णाला चुनाभट्टी पोलीसांनी दाखल केले होते. या रुग्णाला घरी सोडताना पोलीसांना माहिती देण्यासाठी गेलेल्या डॉक्टरला उद्धट उत्तर देण्यात आले, तसेच त्याच्या कानाखाली मारण्यात (police slapped doctor of Sion hospital) आले. याप्रकरणी डॉक्टरला मारहाण करणाऱ्या हवालदाराने लेखी माफी मागावी, तसेच त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेकडून करण्यात आली आहे.

पोलीसांकडून रुग्ण दाखल :याबाबत सविस्तर माहिती अशी की, सायन येथे मुंबई महापालिकेचे लोकमान्य टिळक रुग्णालय आहे. या रुग्णालयात दोन ते तीन महिन्यांपूर्वी चुनाभट्टी पोलीसांनी मोहम्मद नावाच्या व्यक्तीला उपचारासाठी दाखल केले होते. काही दिवसांनी त्याच्या पायाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मोहम्मदवरील उपचार पूर्ण झाल्यावर त्याला रुग्णालयातून सोडण्यासंदर्भातील माहिती चुनाभट्टी पोलीस ठाण्याला देण्यासाठी प्रथम वर्षाचा कनिष्ठ निवासी डॉक्टर गेला होता. यावेळी हवालदार गोसावी यांची भेट घेतली. त्यांनी त्यांना रविवारपर्यंत यासंदर्भात कार्यवाही करण्यात येईल, असे डॉक्टरला सांगण्यात (Sion hospital mard demands apology) आले.



डॉक्टरच्या कानाखाली मारली :परंतु त्यावर काहीही कार्यवाही न झाल्याने बुधवारी सकाळी ११.३० वाजता रुग्णालयातील डॉक्टर पुन्हा पोलीस ठाण्यात गेला. यावेळी तिथे असलेले हवालदार जीतेंद्र जाधव यांनी ही आमची जबाबदारी नसल्याचे संबंधित डॉक्टरला सांगितले. यावर या डॉक्टरने आपण हे लेखी स्वरुपात द्यावे, असे सांगितले असता संतप्त झालेल्या हवालदाराने डॉक्टरला कानाखाली मारली (Police Slapped Doctor) मारली. यामुळे संतप्त झालेल्या मार्डच्या डॉक्टरांनी निषेध व्यक्त केला. मार्ड संघटना, रुग्णालय प्रशासन, चुनाभट्टी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक, रुग्णालयाचे उपअधिष्ठाता यांची बुधवारी बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीत डॉक्टरला मारहाण करणाऱ्या हवालदाराकडून लेखी माफी मागावी, तसेच त्याच्यावर पुढील कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा मार्डकडून पुढील पाऊल उचलण्यात येईल, असा इशारा देण्यात आल्याची माहिती मार्डचे अध्यक्ष डॉ. प्रवीण ढगे यांनी (mard demands apology) दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details