covid19: 'होम क्वारंटाईन' शिक्के असलेले 16 जण पोलिसांच्या ताब्यात...
मुंबई शहरात कोरोना व्हायरस फोफावत असतानाच 16 संशयित रुग्ण बाहेरगावी जात असताना त्यांना छत्रपती शिवाजी स्थानकात ताब्यात घेण्यात आले आहे. या संशयितांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्केही मारण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी होम क्वारंटाईन केंद्रात राहणे अपेक्षित असताना बाहेरगावी निघाले होते.
मुंबई- मुंबई शहरात कोरोना व्हायरस फोफावत असतानाच 16 संशयित रुग्ण बाहेरगावी जात असताना त्यांना छत्रपती शिवाजी स्थानकात ताब्यात घेण्यात आले आहे. या संशयितांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्केही मारण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी होम क्वारंटाईन केंद्रात राहणे अपेक्षित असताना बाहेरगावी निघाले होते. मात्र, रेल्वे पोलिसांच्या निदर्शनाला येताच त्यांना ताब्यात घेऊन वरळीच्या होम क्वारंटाईन केंद्रात पाठवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. यासंदर्भात पुढील तपास सुरू आहे.