विधानभवनाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त
सध्या २८७ आमदारांचा शपथविधी विधानभवनात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर विधानभवनाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
विधानभवनाबाहेरचा पोलिस बंदोबस्त
मुंबई- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या आदेशानंतर मुंबईतील विधान भवनामध्ये निवडून आलेल्या २७८ आमदारांचा शपथविधी होत आहे. याला अनुसरून विधानभवनाच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते विधानभवनाबाहेर जमत असल्याने या ठिकाणी कुठलीही अप्रिय घटना घडू नये, म्हणून पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे.