मुंबई- कोहिनूर मिल प्रकरणी ईडीकडून सध्या चौकशी सुरू आहे. आज (21 ऑगस्ट) सलग तिसऱ्या दिवशी उन्मेष जोशी व राजन शिरोडकर यांची ईडी कार्यालयामध्ये चौकशी करण्यात येत आहे. बुधवारी दुपारी बाराच्या दरम्यान उन्मेष जोशी आणि राजन शिरोडकर हे ईडीसमोर पुढील चौकशीसाठी हजर झाले आहेत. या संदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीसुद्धा गुरुवारी (22 ऑगस्ट) चौकशी केली जाणार आहे. या संदर्भात ईडी कार्यालाजवळील परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी..
कोहिनूर मिल प्रकरण : राज ठाकरेंची 22 ऑगस्टला चौकशी, ईडी कार्यालय परिसरात बंदोबस्त वाढवला - unmesh joshi
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ईडी कार्यालयात 22 ऑगस्टला हजर राहणार आहेत. पण त्यापूर्वी पोलिसांनी मुंबईतील ईडी कार्यालयाबाहेर बंदोबस्त वाढवलेला आहे.
मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ईडी कार्यालयात 22 ऑगस्टला हजर राहणार आहेत, पण, त्यापूर्वी पोलिसांनी मुंबईतील ईडी कार्यालयाबाहेर बंदोबस वाढवलेला आहे.