मुंबई - कर्नाटक मधील बंडखोर आमदार अजूनही मुंबईतील रेनिसन्स या हॉटेलमध्ये थांबले आहेत. येथील आमदारांचे मन वळविण्याच्या दृष्टीने शिवकुमार हे रेनिसन्स हॉटेलमध्ये पोहोचले परंतु पोलिसांनी त्यांना हॉटेलच्या आत जाण्यास रोखले आहे.
कर'नाटक' प्रकरण : हॉटेल रेनिसन्स परिसरात जमावबंदी - renaissance hotel
कर्नाटक मधील बंडखोर आमदार अजूनही मुंबईतील रेनीसेन्स या हॉटेलमध्ये थांबले असून त्यांना भेटण्यास आलेल्या शिवकुमारांना पोलिसांनी हॉटेलच्या आत जाण्यास मज्जाव केला आहे.
कर्नाटक मधील राजकीय नाट्य काही संपायचे नाव घेत नाही आहे. राजीनामा दिलेले आमदार हे पवई येथील रेनिसेन्स या हॉटेलमध्ये थांबले असून त्यांना भेटण्यासाठी काँग्रेसचे नेते शिवकुमार आले आहेत. परंतु पोलिसांनी त्यांना हॉटेलच्या आत जाण्यास मज्जाव केला आहे. त्यांनी केलेले हॉटेल आरक्षण सुद्धा रद्द करण्यात आलेले आहे. यामुळे डी.के. शिवकुमार हे गेल्या चार तासांपासून हॉटेलच्या बाहेर उभे आहेत. त्यांना समजवन्याचे काम मुंबई पोलीस करत आहेत. परंतु त्यांना समर्थन देण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते या भागात गर्दी करत आहेत. त्यामुळे इथे जमावबंदी लागू करण्यात आली असून पोलीस कोणालाही वर सोडत नाही आहेत.