महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एसईबीसी अंतर्गत राज्यात लवकरच पोलीस भरती प्रक्रिया- गृहमंत्री

राज्य सरकारकडून एसईबीसी अंतर्गत पोलीस भरती प्रक्रिया सुरु करण्यात येणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. तसेच 25 जानेवारीपासून मराठा आरक्षणाच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी नियमित सुनावणी होणार असल्याचेही अनिल देशमुख यांनी म्हटले.

police-recruitment-process-will-be-started-under-sebc-said-anil-deshmukh-in-mumbai
एसईबीसी अंतर्गत पोलीस भरती प्रक्रिया सुरु करण्यात येणार - अनिल देशमुख

By

Published : Jan 7, 2021, 5:53 PM IST

मुंबई -मराठा आरक्षणाला घेऊन सर्वोच्य न्यायालयात न्यायालयीन लढाई लढली जात आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. असे असताना राज्य सरकारकडून एसईबीसी अंतर्गत पोलीस भरती प्रक्रिया सुरु करण्यात येणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. यासाठी 4 जानेवारी 2021 ला जारी करण्यात आलेला आदेश रद्द करून 23 डिसेंबर 2020 च्या आदेशानुसार ही पोलीस भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. यामुळे एसईबीसी अंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवारांना याचा फायदा होणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया
मराठा आरक्षणा संर्दभात नियमित सुनावणी होणार -

मराठा आरक्षणाला घेऊन राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायालयीन लढाई लढली जात असताना यासंदर्भात मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आलेली होती. मात्र, 25 जानेवारीपासून मराठा आरक्षणाच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी नियमित सुनावणी होणार असल्याचेही अनिल देशमुख यांनी म्हटले.

हेही वाचा - दिल्लीत शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली, २६ जानेवारीसाठी रंगीत तालीम

ABOUT THE AUTHOR

...view details