मुंबई -पाच तासांच्या कडक चौकशीमंतर मुंबई क्राईम ब्रँच काही महत्वाचे कागदपत्रे घेऊन निघाली. अश्लील चित्रपट बनवल्याप्रकरणी अटक झालेले व्यावसायिक राज कुंद्रांच्या घरी शनिवारी क्राईम ब्रँचची टीम पोहोचली. सलग पाच तासांच्या तपासणीनंतर रात्री 9 वाजता टीम घराबहेर पडली.
राज कुंद्रांच्या घरी पोहोचली पोलीस
त्यांच्या हातात प्रिंटर, लॅपटॉप या साहित्यांनी भरलेली एक बॅग होती. क्राईम ब्रँचच्या 2 गाड्या दुपारी 4 वाजल्यापासून उभ्या होत्या. या दरम्यान राजची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा जवाब नोंदवला. यावेळेस क्राईम ब्रँचसोबत मुंबई पोलीसचे अधिकारीही उपस्थित होते. बियान कंपनीद्वारे केलेल्या आर्थिक व्यवहाराबात तिला अनेक प्रश्न विचारण्यात आले. आता क्राईम ब्रँच पथकाला हाती लागलेल्या पुराव्यानुसार पुढील चौकशी करण्यात येईल.
पॉर्न फिल्म प्रकरणी केली अटक
पॉर्न फिल्मचे शुटिंग करीत असल्याच्या गुन्ह्याखाली राज कुंद्राला मुंबई क्राईम ब्रँचने अटक केली होती. तो पॉर्न व्हिडिओ बनवून अॅपवर अपलोड करीत असल्याचा राजवर आरोप आहे. त्याच्याविरोधात पुरेसे पुरावे असल्याचे मुंबई पोलीसांचे म्हणणे आहे. मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलने पोर्नोग्राफी तयार करण्याच्या गुन्ह्यात राज कुंद्रासह 11 आरोपींना अटक केली आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये मुंबईत अश्लील सिनेमा व चित्रफित बनवले जात असून ते मोबाईल ॲपद्वारे प्रदर्शित केले जात होते. मंगळवारी त्याला न्यायालयाने 27 जुलैपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा -पूरस्थितीची शक्यता... नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत व्हावे - जयंत पाटील