मुंबई- बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी 35 जणांचे जबाब नोंदविल्यानंतर शनीवारी (दि. 18 जुलै) सकाळी 9 वाजता वर्सोवा पोलीस ठाण्यात यश राज फिल्म्सचे दिग्दर्शक, निर्माते आदित्य चोप्रा यांची तब्बल 3 तास चौकशी करून मुंबई पोलिसांनी जवाब नोंदवून घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य चोप्रा यांनी सुशांतसिंह राजपूत याची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिला एक वर्षांपूर्वी युरोपमध्ये एॅड शूटच्या (जाहिरात चित्रिकरण) नावाखाली घेऊन गेले होते. या दरम्यान आदित्य चोप्रा यांच्या क्रेडिट कार्डने रिआ चक्रवर्ती हिने युरोपमध्ये शॉपिंग (खरेदी) केली होती. याबरोबरच युरोप प्रवासाचा संपूर्ण खर्च आपणच केल्याचे आदित्य चोप्रा यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.
सुशांत सिंह राजपूत प्रकरण : आदित्य चोप्रा यांची पोलिसांकडून 3 तास चौकशी - आदित्य चोप्रा बातमी
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूर आत्महत्येप्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात यश राज फिल्म्सचे दिग्दर्शक, निर्माते आदित्य चोप्रा यांची तब्बल 3 तास कसून चौकशी केली आहे.
तसेच काही वर्षांपूर्वी शेखर कपूर हे यशराज फिल्म्स सोबत मिळून पाणी हा चित्रपट बनवत होते. ज्यात सुशांतसिंह राजपूत काम करत होता. मात्र, काही कारणास्तव त्यांच्यात वाद झाल्याने त्यांना हा चित्रपट सोडण्यास सांगण्यात आले होते. या बद्दलही पोलिसांनी आदित्य चोप्रा यांना काही प्रश्न विचारुन उत्तर जाणून घेतली आहेत. सुशांतसिंह राजपूत याच्या सोबत यशराज फिल्म्सने कुठले चित्रपट साईन केले होते व त्यातील काही करार का रद्द करण्यात आले, याबद्दल मुंबई पोलिसांनी आदित्य चोप्रा यांना प्रश्न विचारल्याचे सूत्रांकडून कळत आहे.