मुंबई- अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर मुंबई पोलिसांना या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. आज सकाळपासून सहा जणांची चौकशी करण्यात आली. यानंतर दुपारी सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिची चौकशी करण्यात आली. अर्धा तास चाललेल्या या चौकशीत पोलिसांनी त्यांच्या नातेसंबंधाबद्दल विचारणा केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
सुशांत आत्महत्या प्रकरण : एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेची पोलिसांकडून चौकशी - सुशांत आत्महत्या प्रकरण
सुशांत आणि अंकिता हे सहा वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. त्यामुळे, अंकिताला त्याच्या मानसिक स्थितीबद्दल बऱ्याचशा गोष्टी माहिती असतील अशी पोलिसांना आशा आहे. यापूर्वी पोलिसांनी सुशांतच्या घरातील नोकर, त्याची बहिण, तिचा नवरा, जवळचे मित्र, आणि इतर निकटवर्तीयांची चौकशी केली आहे.
सुशांत आणि अंकिता हे सहा वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. त्यामुळे, अंकिताला त्याच्या मानसिक स्थितीबद्दल बऱ्याचशा गोष्टी माहिती असतील अशी पोलिसांना आशा आहे. यापूर्वी पोलिसांनी सुशांतच्या घरातील नोकर, त्याची बहिण, तिचा नवरा, जवळचे मित्र, आणि इतर निकटवर्तीयांची चौकशी केली आहे. अंकिताने सुशांतशी ब्रेकअप केल्यानंतर आपल्याच सोसायटीत राहणाऱ्या उद्योजक विवेक जैन याला डेट करायला सुरुवात केली होती. त्यानंतर एप्रिल 2020 मध्ये त्यांनी साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला. लवकरच हे दोघे विवाहबंधनात अडकणार होते, अशी चर्चा असतानाच ही घटना घडली.
अंकितानंतर आता या प्रकरणात केंद्रस्थानी असलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिची पोलीस चौकशी होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्यात रियाशी लग्न करणार असल्याचे सुशांतने काही महिन्यांपूर्वी फोन करून आपल्या वडिलांना कळवले होते. त्यामुळे, आता रियाच्या चौकशीतून काय सत्य बाहेर येणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.