मुंबई -राज्यात कोरोनाबाधितांची आकडा वाढतच आहे. लॉकडाऊनमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर जीआरपी पोलीस ठाण्यात हा कर्मचारी कार्यरत आहेत.
मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याला कोरोना; संपर्कात आलेल्या 25 पोलीस कर्मचाऱ्यांना ठेवले देखरेखीखाली - पोलीस कर्मचाऱ्याला कोरोना
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही 320 च्या जवळ गेली असून मुंबईत 171 रुग्ण आहेत. लॉकडाऊनमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. संबंधित पोलीस कर्मचारी आणि त्याच्या कुटुंबीयांना कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
संबंधित पोलीस कर्मचारी आणि त्याच्या कुटुंबीयांना कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याहून हा पोलीस कर्मचारी इतर 25 कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आला असल्याचे समोर आले आहे. 15 मार्च ते 27 मार्च या काळात या कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याला क्वॉरेन्टाईन करण्यात आले आहे.
दरम्यान, राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही 320 च्या जवळ गेली असून मुंबईत 171 रुग्ण आहेत. यात दर दिवशी भर पडत असल्याने सध्या चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.