मुंबई -भाजपा नेते किरीट सोमैयांनी पोलिसांनी आपल्याला चार तास स्वतःच्या घरात डांबून ठेवले असल्याचा आरोप केला आहे. कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करता पोलिसांनी राज्य सरकारच्या आदेशावर आपल्याला घरात स्थानबद्द केले आहे, असा आरोप सोमैयांनी केला. चार तासानंतर आपल्या वकिलांनी पोलिसांना नोटीस दाखवल्यानंतर पोलिसांनी आपल्याला ऑर्डर दाखवली. त्या ऑर्डरमध्ये कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी किरीट सोमैयांना कोल्हापूरला जिल्हा बंदी असल्याच त्यांनी सांगितले आहे. पोलिसांनी आपल्याला गणेश विसर्जनातदेखील सामील होऊन बाप्पाचे दर्शनही घेऊन दिले नाही, असा आरोपही सोमैयांनी केला. तसेच पोलिसांनी केलेल्या कारवाईत बाबत आपण न्यायालयामध्ये दाद मागणार असल्याचेही ते म्हणाले आहेत.
ठाकरे सरकारने आपल्यावर कितीही बंदी घालण्याचा प्रयत्न केला. तरीदेखील आपण ठाकरे सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांना तुरुंगात पाठवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा किरीट सोमैयांनी दिला आहे. तसेच आपण कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूरला जाणार असल्याचेही किरीट सोमैयांनी सांगितले. गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा दर्शन घेण्यासाठी किरीट सोमैया गिरगाव चौपाटीवर पोहोचले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप लावले आहेत.