मुंबई - येथाल विनोभा भावे नगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका सहायक फौजदाराचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
मुंबईत आणखी एका पोलिसाचा कोरोनामुळे बळी, राज्यात पोलिसांच्या मृत्यूचा आकडा 7 वर - मुंबईत आणखी एका पोलिसाचा कोरोनाने मृत्यू
मधुमेहाचा त्रास असलेल्या या फौजदाराला 6 मे रोजी श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या कारणामुळे उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर सरकारी राजावाडी रुग्णालयात हलविण्यात आले, यावेळी त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. तर, मृत्यूनंतर प्राप्त झालेल्या अहवालातून त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
मधुमेहाचा त्रास असलेल्या या फौजदाराला 6 मे रोजी श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या कारणामुळे एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर त्यास सरकारी राजावाडी रुग्णालयात हलविण्यात आल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला, मात्र त्यांच्या मृत्यूचे खरे कारण कळले नव्हते. कोरोना चाचणीचा वैद्यकीय अहवाल आल्यानंतर सदर पोलीस कर्मचाऱ्याला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दुर्दैवाने आत्तापर्यंत राज्यात 7 पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. यात मुंबईतून 4, सोलापूर 1, पुण्यात 1 व नाशिक 1 अशा 7 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
दरम्यान, राज्य पोलीस खात्यातील 714 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. यात 81 पोलीस अधिकारी व 633 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सध्या 648 पोलिसांवर उपचार सुरू असून यात 71 पोलीस अधिकारी व 577 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राज्यात आत्तापर्यंत 51 पोलीस कोरोनातून बरे झाले असून यात 10 पोलीस अधिकारी व 51 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.