महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai News: सीएसएमटी स्थानकात ओव्हर रेड वायरच्या खांबावर चढून आत्महत्येची धमकी, पोलिसांनी घेतले ताब्यात - ओव्हर रेड वायरच्या खांबावर चढून आत्महत्या

सीएसएमटी स्थानकात ओव्हर रेड वायरच्या खांबावर चढणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. हा तरूण खांबावर चढून आत्महत्येची धमकी देत होता.

Mumbai News
सीएसएमटी स्थानक

By

Published : Mar 26, 2023, 12:47 PM IST

सीएसएमटी स्थानकातील घटना

मुंबई :आपण आत्महत्येच्या वेगवेगळ्या बातम्या ऐकतो. पण, मुंबईत आत्महत्या करण्यासाठी चक्क एक व्यक्ती ओव्हर रेड वायरच्या खांबावरती चढल्याची घटना घडली आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या रेल्वे स्थानकामध्ये रात्री 9 च्या सुमारास एक व्यक्ती ओव्हर रेड वायरच्या खांबावर चढला. त्याने तिथून खाली उडी मारून आत्महत्या करण्याची धमकी दिली. या व्यक्तीला अग्निशमन दलाने सुखरूप खाली उतरवून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे नेहमीच प्रवाशांची गर्दी असते.

ओव्हर रेड वायरच्या खांबावरती व्यक्ती चढला : प्लॅटफॉर्म क्रमांक एक ते प्लॅटफॉर्म क्रमांक सात येथून लोकल ट्रेन चालवल्या जातात. तर प्लॅटफॉर्म क्रमांक आठपासून प्लॅटफॉर्म क्रमांक 18 पर्यंत मेल एक्सप्रेस गाड्या चालवल्या जातात. या मेल एक्सप्रेससाठी असलेल्या प्लॅटफॉर्मपैकी प्लॅटफॉर्म क्रमांक नऊ येथील ओव्हर रेड वायरच्या खांबावरती एक व्यक्ती चढला होता. हा व्यक्ती वरून उडी मारून आत्महत्या करू, अशी धमकी देत होता.


व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल :संबंधित व्यक्ती हा मानसिक रुग्ण आहे. तो नेमका खांबावर का चढला? याबाबत आता रेल्वे पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे एक व्यक्ती ओव्हरहेड वायरच्या खांबावर चढला होता. हा व्यक्ती आत्महत्याची धमकी देत होता. या ठिकाणी चाललेला ड्रामा बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात बघ्याची गर्दी जमली होती. या गर्दीमधील लोकांनी याचे व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.


पोलिसांच्या ताब्यात दिले :ओव्हर रेड वायर ही हाय व्होल्टेज असल्यामुळे या वायरीला चिकटून या व्यक्तीचा जळून कोळसा झाला असता. या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये, म्हणून रेल्वे प्रशासनाने त्वरित पोलीस तसेच मुंबई अग्निशमन दलाला घटनास्थळी बोलविण्यात आले. घटनास्थळी आल्यावरती पोलीस आणि अग्निशमन दल या व्यक्तीला खाली उतरण्याची विनंती करत होती. मात्र त्यानंतरही हा व्यक्ती खाली उतरत नव्हता. अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी स्वतः त्या व्यक्तीपर्यंत पोहोचून त्याला सुखरूप खाली उतरवले. त्याला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले.


हेही वाचा : IIT Student Suicide Case : आयआयटीने प्रकरणाची एकतर्फी चौकशी केली; दर्शनच्या कुटुंबीयांचा गंभीर आरोप

ABOUT THE AUTHOR

...view details