महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Anil Deshmukh : अनिल देशमुखांच्या स्वागतासाठी बाईक रॅलीला पोलिसांनी नाकारली परवानगी

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Former Home Minister Anil Deshmukh ) यांचा 100 कोटी वसुली प्रकरणात कारागृहातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आज अनिल देशमुख यांची आर्थर रोड कारागृहातून तब्बल 13 महिन्यानंतर मुक्तता होणार ( Anil Deshmukh come out jail after 13 months ) असून त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेस जय्यत तयारी करत आहे. मात्र राष्ट्रवादी युवक काँग्रेस कडून काढल्या जाणाऱ्या बाईक रॅलीला ( bike rally of rashtavadi yuvak congress ) मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.

Anil Deshmukh
अनिल देशमुख

By

Published : Dec 28, 2022, 3:52 PM IST

मुंबई : राज्यात गाजलेल्या 100 कोटी वसुली घोटाळ्याचा आरोप असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Former Home Minister Anil Deshmukh ) गेल्या अनेक दिवसांपासून कारागृहात होते. त्यांना नुकताच जामीन मंजूर झाला असून त्यांचा कारागृहाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आज अनिल देशमुख यांची आर्थर रोड कारागृहातून मुक्तता होणार असून त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेस जय्यत तयारी करत आहे. मात्र राष्ट्रवादी युवक काँग्रेस कडून काढल्या जाणाऱ्या बाईक रॅलीला ( bike rally of rashtavadi yuvak congress ) एन एम जोशी पोलीस ठाण्याने परवानगी नाकारली ( N M joshi police denies permission ) आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चंद्रमोरे यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अ‍ॅड. निलेश प्रकाश भोसले यांना नोटीस बजावून परवानगी नाकारल्याची माहिती दिली आहे.

रॅलीला परवानगी नाकरली :विभागीय राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस तर्फे आर्थर रोड कारागृह ते सिद्धी विनायक मंदिर अशी बाईक रॅली काढणार आहेत. या बाईक रॅलीमध्ये मोठया प्रमाणात लोक सामिल होणार असल्याने परिसरात आणि बाईक रॅलीच्या मार्गावर आपल्या अशा कृतीमुळे कायदा व सुव्यवस्थेवा प्रश्न निर्माण होवू शकतो तसेच सार्वजनिक किंवा खाजगी मालमत्तेचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे, फौजदारी प्रक्रिया संहिता सन १९७३ च्या कलम १४९ अन्वये प्राप्त अधिकारान्वये सुनील चंद्रमोरे यांनी निलेश भोसले यांना नोटीस बजावली आहे.

यामुळे नाकरली परवानगी : बजावण्यात आलेल्या नोटिसमध्ये असे सांगण्यात आले की, आपणाकडुन असे कोणतेही कृत्य की, ज्याद्वारे दखलपात्र / अदखलपात्र गुन्हा तसेच सार्वजनिक शांततेस बाधा निर्माण होईल असे कोणतेही कृत्य आपण किंवा आपल्या कार्यकर्तामार्फत करू नये. तसेच बाईक रॅली काढू नये. जर असे कोणतेही कृत्य आपणांकडुन झाल्यास त्याबाबत आपण कायदेशीर कारवाईस पात्र राहाल व त्यानुरूप कायदेशीर कारवाई केली जाईल असे नमूद करण्यात आले आहे.

13 महिन्यानंतर कारागृहाबाहेर : अनिल देशमुख यांच्या जामिनावरील स्थगिती आणखी वाढविण्याची सीबीआयची मागणी हायकोर्टाने मंगळवारी फेटाळली. याला स्थगिती मागणे आणखी किती काळ चालणार? अशा शब्दांत कोर्टाने सीबीआयला फटकारले. देशमुख बुधवारी कारागृहातून बाहेर येण्याची शक्यता आहे. त्यांनी कारागृहात १३ महिने २६ दिवस काढले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details