मुंबई - पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँके(पीएमसी)च्या घोटाळ्याप्रकरणी बँकेचा माजी संचालक सुरजित सिंग अरोरा याला आज न्यायालयामध्ये हजर केले. न्यायालयाने त्याची रवानगी 22 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत केली आहे.
पीएमसी बँकेचा एमडी जॉय थॉमस यालाही गुरूवारी न्यायालयात हजर केले. आर्थिक गुन्हे शाखेने जॉय थॉमस याच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्याची मागणी केली. मात्र, यावर जॉय थॉमसच्या वकिलांनी तीव्र आक्षेप घेतला. जॉय थॉमसच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची गरज नसून पोलिसांनी सर्व चौकशी केली आहे, असा दावा थॉमसच्या वकिलांनी केला. यावर न्यायालयाने थॉमसला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.