मुंबई- CSMT पूल दुर्घटनेप्रकरणी आरोपी नीरजकुमार देसाईला मंगळवारी किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने आरोपीला २५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंबईतील सीएसएमटी स्थानकाच्या बाहेर असलेला पूल १४ मार्चला पडला होता. या घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला होता तर ३१ जण जखमी झाले होते.
पोलीस चौकशीत या गुन्ह्यात ३०४/२ कल्पेबल होमिसाईड हा गुन्हाची नव्याने नोंद केल्यानंतर या प्रकरणी संशयित आरोपी नीरजकुमार देसाई या स्टक्चरल ऑडिटरला अटक करण्यात आली होती.
CSMT पूल दुर्घटना: नीरजकुमार देसाईला २५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी नीरजकुमार देसाई एक्स्पर्ट असूनदेखील ऑडिट करणाऱ्यांनी निष्कळजीपणा दाखवला म्हणून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑडिट करणाऱ्या व्यक्तीने जाणूनबुजून निष्काळजीपणा दाखवला म्हणून ही दुर्घटना घडल्याचे पोलीस तापासत समोर आले आहे. आरोपी नीरज देसाई हा ME असून एक्सपर्ट आहे त्यानेच या पुलाचे ऑडिट केले होते.
पोलिसांनी या प्रकरणी जखमी लोकांच्या आणि मृतांच्या नातेवाईकांचे जबाब घेतले आहेत. या प्रकरणी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी संजय दराडे यांचीदेखील चौकशी झाली आहे. पालिकेच्या काही अधिकाऱ्यांचीदेखील करण्यात आली आहे. त्यामुळे अधिक तपासासाठी आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली होती. त्यामुळे न्यायालयाने नीरजकुमार देसाई यास २५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
तर आरोपीची वकील अॅड. लक्ष्मी मुरली यांनी स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये पूल दुरुस्ती करण्यासाठी सांगितले होते, असा दावा केला आहे.