महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खाकी वर्दीला काळीमा.! वडाळ्यात अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे; पोलीस कॉन्स्टेबल गजाआड - कोर्टात

अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक छेडछाड करण्याच्या आरोपाखाली एका पोलीस कॉन्स्टेबलला वडाळा पोलिसांनी अटक केली आहे.आरोपी पोलीस मुंबई पोलिसांच्या लोकल आर्म्स विभागात तो कार्यरत आहे.

आरोपी कॉन्स्टेबल

By

Published : Jun 21, 2019, 5:19 PM IST

मुंबई- 4 वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक छेडछाड करण्याच्या आरोपाखाली एका पोलीस कॉन्स्टेबलला वडाळा पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या लोकल आर्म्स विभागात कार्यरत असलेला पोलीस कॉन्स्टेबल संजय वाघमोडे (35) असे त्या आरोपीचे नाव आहे.

वडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या आरोपी संजय वाघमोडे याने 17 जून रोजी घराबाहेर खेळत असलेल्या एका चार वर्षाच्या अल्पवयीन मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने घरात आणले. यानंतर आरोपीने अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक चाळे करण्यास सुरुवात केली. यादरम्यान घाबरलेली पीडित अल्पवयीन मुलगी संजय वाघमोडे याच्या घरातून रडत रडत बाहेर आली. पीडित मुलगी तिच्या घरी आल्यावर घडलेला सर्व प्रकार तिने तिच्याआईला सांगितला. त्यानंतर तिच्या घरच्यांनी वडाळा पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

पोलिसांनी या संदर्भात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवत आरोपीला अटक करून कोर्टात हजर केले. न्यायालयाने आरोपीची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details