मुंबई : मानवी तस्करी करणाऱ्या दलालांशी हातमिळवणी (Collusion with human trafficking brokers) करून तब्बल 43 लोकांना बेकायदेशीरपणे परदेशात पाठवण्यास (illegal repatriation) मदत करणाऱ्या मुंबई पोलीस दलातील पोलीस हवालदारास बडतर्फ करण्यात (police constable dismissed) आलले आहे. तसेच गुप्तचर विभागाचे दोन अधिकारीही या रॅकेटमध्ये सामील असल्याची माहिती मिळत आहे.
Police Constable Dismissed : लोकांना बेकायदेशीरपणे परदेशात पाठवण्यास मदत करणाऱ्या पोलीस हवालदाराला केले बडतर्फ - बेकायदेशीरपणे परदेशात पाठविणे
मानवी तस्करीत गुंतलेल्या दलालांशी हातमिळवणी (Collusion with human trafficking brokers) करणे एका पोलीस कॉन्स्टेबलला चांगलेच महागात पडले आहे. कॉन्स्टेबलकडून तब्बल 43 लोकांना बेकायदेशीरपणे परदेशात पाठवण्यास (illegal repatriation) आले. या प्रकरणी पोलीस हवालदारास बडतर्फ करण्यात (police constable dismissed) आलले आहे.
बनावट पासपोर्ट वापरून परदेशात पाठविले :पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार संजय थोरात यांची 2017 मध्ये इमिग्रेशन आणि पासपोर्ट क्लिअरन्सची देखरेख करणाऱ्या विशेष शाखा II मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. मानवी तस्करी करणाऱ्या टोळ्यांशी हातमिळवणी करून किमान 43 लोकांना बनावट पासपोर्ट वापरून परदेशात पाठविले. त्यांच्यावर हे आरोप झाल्यानंतर 5 वर्षे त्यांची चौकशी झाली.
पोलिसाची मानवी तस्करी करणाऱ्या दलालाशी हातमिळवणी :या चौकशीअंती दोषी आढळल्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात आले. आता 25 नोव्हेंबर रोजी थोरात यांना कार्यमुक्तीचा आदेश जारी करण्यात आले आहेत. पोलिसांनी सांगितले की, थोरात याने मानवी तस्करी करणाऱ्या दलालांशी हातमिळवणी केली होती. 2017 मध्ये बनावट आणि फसवणूक उघडकीस आल्यानंतर सहार पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर तपासात गुप्तचर विभागाचे दोन अधिकारीही या रॅकेटमध्ये सामील असल्याचे आढळून आले. तसेच त्यांच्यावर कारवाई देखील झाली होती अशी माहिती पोलिसांनी दिली.