मुंबई- भोईवाड्यात एक पोलीस हवालदार (२९वर्ष) आत्महत्या करण्यासाठी इमारतीवर चढला होता. तीन तासांच्या थरारानंतर त्या हवालदाराला इमारतीखाली उतरवण्यात पोलीस आणि अग्निशामक दलाच्या जवानांना यश आहे.
आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याला पोलीस हवालदाराला वाचवण्यात यश - भोईवाडा पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न
भोईवाडा परिसरातील एका इमारतीवर चढून एका पोलीस हवालदाराने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तीन तासांनी पोलिसांच्या मदतीने अग्निशामक दलाच्या जवानांनी त्याला सुखरूप खाली उतरवले.
आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याला पोलीस हवालदाराला वाचवण्यास यश
भोईवाडा विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त संगीता पाटील यांनी तीन तासांत सतत त्याच्याशी संवाद साधत त्याचे समुपदेशन केले. तेव्हापर्यंत अग्निशामक दल त्या इमारतीपर्यंत पोहोचले. सदर व्यक्ती इमारतीवरून उडी मारण्याची धमकी देत होता. अखेर पोलीस व अग्निशामक दलाला त्याला खाली उतरवण्यात यश आले. पुढील उपचारासाठी त्याला शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे.
Last Updated : Jun 13, 2020, 5:12 PM IST