नवी मुंबई :पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलस कर्मचाऱ्याने सीबीडी परिसरात राहणाऱ्या ( Police Constable Aattempt Rape On Women In CBD Area ) एका 36 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रवीण बाबुलाल निकुंभ, ( Pravin Nikumbh ) असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून सीबीडी पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रवीण निकुंभ सध्या नेरुळ पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.
धमकी देऊन लैंगिक अत्याचार -
या प्रकरणातील पीडित महिला सीबीडी परीसरात राहण्यास असून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणारा पोलीस शिपाई प्रवीण निकुंभ हा २०१७ मध्ये सीबीडी परिसरात राहाण्यासाठी होता. त्यावेळी प्रवीणने रात्रीच्या सुमारास पीडित महिलेच्या घरामध्ये घुसून तीच्याकडे शरीर सुखाची मागणी केली होती. त्यानंतर दोन महिन्यानंतर त्याने मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास पीडित महिलेवर लैंगिक अत्याचार केला होता. तसेच जुलै २०१९ मध्ये पीडित महिलेसोबत जवळीक साधल्याचा व्हिडीओ पीडित महिलेच्या पतीला दाखविण्याची धमकी देऊन तिच्यावर पुन्हा लैंगिक अत्याचार केले होते. त्यानंतर देखील आरोपीने पीडित महिलेला त्रास देत असल्याने अखेर या महिलेने या प्रकाराची माहिती आपल्या पतीला देऊन त्यांच्या सल्ल्यानुसार सीबीडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी पोलीस शिपाई प्रवीण निकुंभ याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा-Mumbai Corona Update : मुंबईत सलग दुसऱ्या दिवशीही कोरोना रुग्णसंख्येत घट, १० जणांचा मृत्यू