मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर एसटी कामगारांनी केलेल्या आंदोलनाप्रकरणी अटक करण्यात आलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या निवासस्थानी पोलिसांनी १० एप्रिलच्या रात्री शोधमोहीम राबवली.
शरद पवार यांच्या घरावर झालेल्या (Sharad Pawar House Protest) आंदोलनाप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर इतर 109 आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आंदोलनाच्या दिवशी कामगारांचे प्रतिनिधीत्व करणाऱया ४ जणांना रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आरोपींनी आंदोलनाच्यावेळी अनेक गोष्टींचे नुकसान केले आहे, त्याचे सीसीटीव्हीही आहेत. आरोपीची भाषा ही कुणीतरी बोलायला लावणारी होती. त्यामुळे नक्कीच त्यांना भडकवले असल्याचे दिसून येते असे या प्रकरणात सरकार पक्षाचे म्हणने आहे.