मुंबई- एनआरसी आणि सीएए (नागरिकत्व संशोधन सुधारणा कायदा) कायद्यावरून देशात तणाव निर्माण झाला आहे. आज मुस्लीम धर्मगुरू आणि मौलाना यांची एका कार्यक्रमादरम्यान मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी भेट घेतली. या भेटीत बर्वे यांनी या कायद्याबाबत मुस्लिमांच्या मनात असलेली गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला.
सीएए कायद्याविषयी पोलीस आयुक्त संजय बर्वेनी केली मुस्लीम धर्मगुरुंशी चर्चा - पोलीस आयुक्त संजय बर्वे मुंबई बातमी
एनआरसीची समस्या बाहेरील लोकांची आहे. आफ्रिकेतून येणारे लोक येथे येऊन त्यांचे पासपोर्ट फाडतात. शिक्षा भोगतात आणि बाहेर पडतात. त्यांच्यासोबतच नायजेरिया, टांझानिया, सोमालियामधील लोक आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांना काळजी करण्याची गरज नाही. गिरगाव चौपाटी, येथील मिरवणुकीला मुंबई पोलिसांनी परवानगी दिली नाही. मुंबई पोलिसांनी ऑगस्ट क्रांती मैदानाला परवानगी दिली.
![सीएए कायद्याविषयी पोलीस आयुक्त संजय बर्वेनी केली मुस्लीम धर्मगुरुंशी चर्चा police-commissioner-sanjay-barve-discuss-cca-act-with-muslim-in-mumbai](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5492207-thumbnail-3x2-mum.jpg)
हेही वाचा-पुण्यातील बारमध्ये बाऊन्सरचा गोळीबार; दारुचे बिल देण्यावरून वाद
यावेळी बोलताना बर्वे म्हणाले की, एनआरसीची समस्या बाहेरील लोकांची आहे. आफ्रिकेतून येणारे लोक येथे येऊन त्यांचे पासपोर्ट फाडतात. शिक्षा भोगतात आणि बाहेर पडतात. त्यांच्यासोबतच नायजेरिया, टांझानिया, सोमालियामधील लोक आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांना काळजी करण्याची गरज नाही. गिरगाव चौपाटी, येथील मिरवणुकीला मुंबई पोलिसांनी परवानगी दिली नाही. मुंबई पोलिसांनी ऑगस्ट क्रांती मैदानाला परवानगी दिली. ऑगस्ट क्रांती मैदानात पोलिसांनी केलेले कामाचे कौतुक सर्वत्र केले जात आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये काय घडले हे आपणास माहित आहे. सर्वसामान्यांनी मुंबई पोलिसांना चहा पाजला आणि झिंदाबादचे नारे लावले. मी तुमच्याकडे निवेदन आणि इच्छा घेऊन आलो आहे की, मुंबईमध्ये शांतता आणि दोन समाजात सुसंवाद राहिला पाहिजे. सीएए कायदा 5 वेळा बदलण्यात आला आहे, हा सहावा बदल आहे.
1971 च्या युद्धाच्या वेळी बांगलादेशातून बरेच लोक भारतात आले. बांगलादेशी पश्चिम बंगाल, ईशान्य राज्यात आले. कोर्टाने आसाममध्ये एनआरसी लागू करण्यास सांगितले. उर्वरित देशात एनआरसी नियम बनलेला नाही. जो सर्वांच्या संमतीने बनविला जाईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्रातील कोणालाही सीएए किंवा एनआरसीमध्ये अडचण येणार नाही. माझा जन्म घरी झाला आहे, माझ्याकडे जन्म प्रमाणपत्र नाही. मी मोठा झालो, वाढलो, देशाची सेवा केली. असे बरेच लोक आहेत. पण आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. एनआरसीची समस्या बाहेरील लोकांची आहे. भारताच्या प्रगतीसाठी मशिदीबाहेर प्रार्थना करा, असे बर्वे यांनी यावेळी सांगितले.