महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Man Arrested with Knife In Ministry: मंत्रालयात चाकू घेऊन आत प्रवेश करणाऱ्या तरुणाला अटक - entered ministry with knife

मंत्रालयातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मंत्रालयात चाकू घेऊन जाताना एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. नवीन प्रशासकीय इमारतीच्या सुरक्षा गेटवर हा प्रकार समोर आला आहे. प्रशासकीय इमारतीत चाकू घेऊन जाताना एक इसमाला गेटवरच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चाकू घेऊन जाणाऱ्या तरुणाचे नाव ज्ञानेश्वर सूर्यवंशी (वय २९) आहे. (Police arrested young man) (entered ministry with knife) (Man Arrested with Knife In Ministry)

Man Arrested with Knife In Ministry
तरुणाला पोलिसांनी केली अटक

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 31, 2023, 10:52 PM IST

मुंबई:मंत्रालयात येणाऱ्यांच्या बॅगेची गेटवर तपासणी केली जाते. यावेळी बॅग स्कॅनरमध्ये बॅग स्कॅन होताना धारधार चाकू सापडल्याचे समोर आले आहे. दरम्यान पोलिसांनी वेळीच सावध भूमिका घेत चाकू ताब्यात घेतला आहे. हा तरुण उस्मानाबादमधील उमरगा येथून आला होता. त्याने चाकू कशा करता आणला होता? याबाबत मरीन ड्राईव्ह पोलीस तपास करत आहेत. मात्र सध्या तरी ज्ञानेश्वर सूर्यवंशी या आरोपी शेतात काम करण्यासाठी चाकू वापरतो. तो बॅगेतच राहिला असल्याचे उत्तर देत असल्याची माहिती मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बागुल यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली. (Police arrested young man) (entered ministry with knife) (Man Arrested with Knife In Ministry)

मंत्रालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी:दुपारी मंत्रालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिल्याच्या फोननंतर आता धारदार चाकू घेऊन मंत्रालयात प्रवेश करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका २९ वर्षीय व्यक्तीला मरीन ड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ही व्यक्ती उस्मानाबाद येथील उमरगातील रहिवासी असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे. मंत्रालयाच्या आवारात सुरक्षा रक्षकांनी त्याची बॅग स्कॅन केली त्यात त्याच्या बॅगेत काहीतरी धातूची वस्तू असल्याचं डिटेक्ट झालं. त्यानंतर या व्यक्तीची बॅगची प्रत्यक्ष तपासणी केल्यानंतर यात एक धारदार चाकू आढळून आला.

म्हणे, मुख्यमंत्र्यांशी बोलणे करून द्या:मंत्रालयात बॅाम्ब ठेवल्याचा फोन आल्याने खळबळ उडाली होती. यामध्ये मंत्रालय उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. गेल्या 15 दिवसात दुसऱ्यांदा मंत्रालय उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. निनावी फोन करणाऱ्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणे करून देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांसोबत बोलणे करून दिले नाही तर मंत्रालयात ठेवलेला बॅाम्बने मंत्रालय उडवून देण्याची धमकी कॉलवर देण्यात आली आहे. निनावी फोन करणाऱ्या व्यक्तीने अहमदनगर येथून फोन केल्याचा प्राथमिक तपासात उघड झाले. त्यानंतर मुंबई पोलिसांकडून अहमदनगरच्या पोलीस अधीक्षकांना याबाबत माहिती देण्यात आली. या फोननंतर मंत्रालयात बॉम्ब शोधक दाखल झाले होते.

हेही वाचा:

  1. Bomb Placed In Mumbai Mantralaya : मुख्यमंत्र्यांशी बोलू द्या अन्यथा...; मंत्रालय उडवून देण्याची दुसऱ्यांदा धमकी
  2. Father Scolded Girl Ran Away : मोबाईलवर बोलते म्हणून वडील ओरडल्याने मुंबईतून अल्पवयीन मुलीने गाठलं तेलंगाणा, वाचा पुढे काय झालं...
  3. Girl Child Rescue Nagpur : नागपुरात आठ वर्षीय चिमुकलीला कोंडून दाम्पत्य बंगलोरला; मुलीची सहा दिवसांनंतर सुटका

ABOUT THE AUTHOR

...view details