मुंबई -पंचतारांकित हॉटेलमध्ये देहव्यापार करणाऱ्या 2 बॉलिवूड महिला कलाकारांना दिंडोशी पोलिसांनी अटक केली आहे. याबरोबरच पोलिसांनी २ महिलांची सुटकाही केली आहे. अटक केलेल्या महिला देह व्यापार करण्यासाठी महिलाही पुरवित असल्याची माहिती मिळाली आहे.
मुंबईत हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश.. बॉलिवूडच्या दोन महिला कलाकारांना अटक - 2 बॉलिवूड महिला कलाकारांना दिंडोशी पोलिसांनी अटक केली
पंचतारांकित हॉटेलमध्ये देहव्यापार करणाऱ्या 2 बॉलिवूड महिला कलाकारांना दिंडोशी पोलिसांनी अटक केली आहे. याबरोबरच पोलिसांनी २ महिलांची सुटकाही केली आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून दिंडोशी परिसरात असलेल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये देहव्यापार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. यासंदर्भात कारवाई करण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या टीममधील काही अधिकाऱ्यांना बनावट ग्राहक बनवून या हॉटेलमध्ये पाठवले होते. मिळालेल्या गुप्त माहितीची शहानिशा झाल्यानंतर पोलिसांनी या हॉटेलमधील रुमवर धाड मारल्यानंतर २ महिला कलाकारांना पैसे घेताना रंगेहात पकडले. पोलिसांनी 370(3), 34 अनैतिक देह व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केली आहे. दोन बॉलिवूड महिला कलाकारांना अटक करीत २ पीडित महिलांची सुटकाही पोलिसांनी केली आहे.