महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 8, 2020, 3:18 PM IST

Updated : Jul 8, 2020, 3:27 PM IST

ETV Bharat / state

राजगृह तोडफोड : एकजण ताब्यात, कडक कारवाई करण्याचे सहआयुक्तांचे आश्वासन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या 'राजगृहा'ची मंगळवारी सायंकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केली आहे. याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांना एकाला ताब्यात घेतले.

rajgruh attack  babasaheb ambedkar house rajgruh attack  babasaheb ambedkar house  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे घर  राजगृह हल्ला  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घरावर हल्ला
राजगृह तोडफोड : एकजण ताब्यात, कडक कारवाई करण्याचे सहआयुक्तांचे आश्वासन

मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान 'राजगृह'च्या तोडफोडप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस सहआयुक्त विनय चौबे यांनी दिले. तसेच राजगृह परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी एकाला ताब्यात घेतल्याचे चौबे यांनी सांगितले.

राजगृह तोडफोड : एकजण ताब्यात, कडक कारवाई करण्याचे सहआयुक्तांचे आश्वासन

नेमकी काय आहे घटना? -

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या 'राजगृहा'ची मंगळवारी सायंकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केली आहे. घरांच्या काचांवरही दगडफेक झाली आहे. यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात, इतके महत्त्वाचे हे स्थान आहे. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे. मंगळवारच्या घटनेनंतर देशभर निषेध व्यक्त होत आहे.

Last Updated : Jul 8, 2020, 3:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details