महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विदेशात जाण्याची हौस असेल तर सावध! लुटणाऱ्या आठ जणांच्या टोळीला अटक

विदेशात पाठवण्याच्या नावाखाली निर्जनस्थळी नेऊन लुटणाऱ्या टोळीचा साकीनाका पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली. आरोपी बनावट नंबर प्लेट असलेली कार आणून विदेशात पाठवण्यासाठी इमिग्रेशन अधिकाऱ्याला भेटण्याच्या बहाण्याने दरोडा घालत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले.

Police arrested group of eight people
आठ जणांच्या टोळक्याला पोलिसांनी केली अटक

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 13, 2023, 12:45 PM IST

पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे

मुंबई :अमेरिका आणि युरोपमध्ये पाठवतो म्हणून हॉटेलमधून नेत कळंबोली मॅक्डोनाल्ड येथे लुटल्याची तक्रार साकीनाका पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या दाखल तक्रारीच्या आधारे भारतीय दंड संविधान कलम 397, 364 अ, 365 120 बी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासासाठी आठ पथके पोलिसांनी तयार केली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी अटक केलेल्या आठ जणांमध्ये तीन ट्रॅव्हल एजंट आहेत. तर इतर पाच जण त्यांचे चालक आणि इतर कर्मचारी आहेत.

  • विशेष म्हणजे एजंटनेच उत्तर भारतात राहणाऱ्या लोकांना आपल्या फसवणुकीच्या जाळ्यात ओढले. यापूर्वी आरोपी कोणत्या व्यक्तीकड पैसे आहेत, याची खातरजमा करत असत. त्याआधारे विदेशात जाण्यासाठी हॉटेलमधून अधिकाऱ्याला भेटण्याच्या नावाखाली निर्जनस्थळी घेऊन जात. तिथं त्यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करून पैसे लुटून आरोपी फरार व्हायचे.

11 हजार डॉलर्सची मागणी : पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी सांगितले की, "आरोपींनी पीडितांना 11 हजार डॉलर आणण्यास सांगून आणि विमानतळाजवळ हॉटेल बुक करण्यास सांगितले होते. इटलीला जाण्यासाठी मुंबईत हॉटेल बुक केलेल्या दोन भावांचे अपहरण करून दरोडा टाकून आरोपी पळून गेले."


विमानतळावरून अपहरण: पोलिसांनी सांगितले की, "आरोपींनी विमानतळाजवळ हॉटेलचे बुकिंग करण्यास सांगितले होते. जेणेकरून ते खरोखरच अधिकाऱ्याला भेटायला जात असल्याची खात्री पटली. बनावट नंबर देऊन आरोपी हॉटेलमध्ये पोहोचले. इटलीला जाण्यासाठी मुंबईत पोहोचलेल्या भावांचे हॉटेलच्या बाहेरून अपहरण करण्यात आले. यानंतर त्यांना बाहेर निर्जनस्थळी नेऊन मारहाण केली. लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. यामध्ये एक भाऊ गंभीर जखमी झाला आहे. यानंतर आरोपीनं सोबत असलेले पैसे घेऊन पळ काढला."


4 हजार डॉलर्स जप्त : आरोपीनं जबरी चोरी करण्यासाठी मुंबई शहराची निवड केली. कारण पीडित जर दुसऱ्या राज्यातील असेल तर त्याची मुंबईत ओळख पटणार नाही. त्यामुळे त्याला पोलीस ठाण्यातही तक्रार करता येणार नाही. त्यामुळेच आरोपींनी त्याला मुंबईतून घेऊन नवी मुंबई गाठली. मात्र आता आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी 4 हजार डॉलर्सही जप्त केले असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा :

  1. जालन्यात दिवसा ढवळ्या गँगवॉर? गजानन तौर यांची गोळीबार करुन हत्या
  2. अंगडिया लूट प्रकरण; सहा आरोपींना अटक, पोलिसांनी केले 4 कोटी जप्त
  3. हत्येच्या आरोपीनं कायद्याचा अभ्यास करून लढला स्वतःचा खटला, १२ वर्षांनंतर निर्दोष मुक्त!

ABOUT THE AUTHOR

...view details