महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Police Arrested E Cigarette Seller : ई सिगरेट विक्री करणाऱ्यास पोलिसांनी रंगेहात पकडले ; 15 पेक्षा जास्त ई सिगरेट पाकिटे जप्त - ई सिगरेट पाकिटे जप्त

लेक्ट्रॉनिक सिगारेट खुलेआमपणे विकण्याचे काम करणाऱ्या एका व्यक्तीला बांगुर नगर पोलिसांनी अशा एक व्यक्तीला अटक केली (police arrested e cigarette seller in Mumbai) आहे. तो बांगुर नगर परिसरात कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुण तरुणींना ई सिगरेट पुरवण्याचे काम करत होता. त्याच्याकडून 15 पाकिटे जप्त करण्यात आली. पुढील तपास सुरु (e Cigarette packets seized ) आहे.

Police Arrested E Cigarette Seller
ई सिगारेट विक्रेत्याला पोलिसांनी अटक केली

By

Published : Dec 10, 2022, 10:22 AM IST

मुंबई :मुंबईच्या बांगुर नगर पोलिसांनी अशा एक व्यक्तीला अटक केली (Police Arrested E Cigarette Seller) आहे. तो महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या इलेक्ट्रॉनिक सिगारेटखुलेआमपणे विकण्याचे काम मागील अनेक महिन्यापासून करत होता. सुरेंद्र चौरसिया असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पोलीसांनी 15 पेक्षा अधिक ई सिगरेट पाकीट जप्त केली आहेत.

ई सिगरेट पुरवण्याचे काम :मिळालेल्या माहितीनुसार बांगुर नगर परिसरात कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुण तरुणींना ई सिगरेट पुरवण्याचे काम आरोपी सुरेंद्र चौरसिया (E Cigarette Seller) मागील अनेक महिन्यांपासून करत होता. याबाबतची माहिती बांगुर नगर पोलिसांना 5 डिसेंबर रोजी मिळाली. यानंतर बांगुर नगर पोलीस ठाण्याचे एटीसी पथकाने कॉल सेंटर परिसरातील फुटपाथवर ई सिगरेट विकत असताना सुरेंद्र चौरसियाला ताब्यात (e cigarette seller in Mumbai) घेतले.

गुन्हा दाखल :पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याच्याकडे महाराष्ट्रात प्रतिबंधित असणारी सिगरेटची 15 पॅकेट आढळून (police arrested e cigarette seller in Mumbai) आली. ज्यांची किंमत अंदाजे 15000 रुपये इतकी आहे. बांगुर नगर पोलिसांनी आरोपी सुरेंद्र चौरसिया विरोधात इलेक्ट्रॉनिक सिगरेटनुसार गुन्हा दाखल केला असून कुणाकडून आणत आहे, नेमक्या कुणाकुणाला विकत असतो याचा तपास करत (e Cigarette packets seized) आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details