मुंबई - एमएचबी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणपत पाटील नगरात दहशत पसरविणाऱ्या एका आरोपीला पकडून पोलिसांनी त्याची धिंड काढली आहे. यावेळी पोलिसांनी नागरिकांना या गुंडाला हफ्ता न देण्याचे आव्हान केले आहे. मारू असे त्या गुंडाचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केले आहे.
मुंबई पोलिसांनी काढली सराईत गुंडाची धिंड; हफ्ता न देण्याचे नागरिकांना केले आवाहन - social media
एमएचबी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी या आरोपीला बेड्या घालून संपूर्ण गणपत पाटील नगरातून त्याची धिंड काढली. या दरम्यान या आरोपीला कुणीही हफ्ता न देता थेट पोलीस ठाण्यात येऊन तक्रार देण्याचे आवाहन पोलिसांनकडून नागरिकांना केले जात आहे.
अटक आरोपी हा ४ खून, खंडणी, जबरी चोरी व इतर २२ गंभीर गुन्ह्यांमधील आरोपी आहे. काही दिवसांपूर्वी तुरुंगातून सुटून बाहेर आल्यावर मारू या गुंडाने पुन्हा परिसरात हफ्ता वसुली करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर एमएचबी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी या आरोपीला बेड्या ठोकून संपूर्ण गणपत पाटील नगर हद्दीतून त्याची धिंड काढली. या दरम्यान या आरोपीला कुणीही हफ्ता न देता थेट पोलीस ठाण्यात येऊन तक्रार देण्याचे आवाहन पोलिसांनकडून नागरिकांना केले जात आहे. समाज माध्यमांवर पोलिसांच्या या सिंघम स्टाईल कारवाईचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे.