महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ban on flags with sticks : लाठीसह झेंडे घेऊन आलेल्या चाहत्यांना पोलीस आणि बीसीसीआय रोकणार - Bengal Royals vs Rajasthan Royals

कोरोना परिस्थिती आटोक्यात आल्यामुळे (Corona's situation is under control) दोन वर्षानंतर यावर्षी आयपीएलच्या थरार (The thrill of IPL) चाहत्यांना प्रत्यक्षात पाहणे शक्य होणार आहे. मात्र चाहत्यांना आता स्टेडियम मधे काठ्या असलेले ध्वज घेउन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. असा ध्वज घेऊन जाणाऱ्या बंगाल रॉयल टीमच्या एका चाहत्याला असेच अडवण्यात आले. मुंबई पोलीस आणि बीसीसीआय अशा चाहत्यांना बाहेरच अडवणार (Police and BCCI will stop fans carrying flags with sticks) आहे.

Ban on flags with sticks
लाठीसह झेंड्यांवर बंदी

By

Published : Apr 8, 2022, 3:06 PM IST

मुंबई:बंगाल रॉयल्स विरुद्ध राजस्थान रॉयलचा (Bengal Royals vs Rajasthan Royals) सामना गुरुवारी वानखेडे स्टेडियम (Wankhede Stadium) मध्ये झाला हा सामना पाहण्यासाठी बंगाल रॉयल्स चा कर्णधार असलेल्या विराट कोहलीचा चिराग खिलारे हा चाहता काठीसह आणलेल्या ध्वजा घेऊन जात होता. त्याला सुरक्षारक्षकांनी डवले त्याला सांगण्यात आले की ध्वज असलेल्या लाठ्या आत मध्ये नेण्यास बंदी आहे. त्याने सुरक्षारक्षकांना एका तासा पासून विनंती केल्यानंतर अखेर त्याला झेंडा घेऊन जाण्याची परवानगी देण्यात आली.

आयपीएलच्या या सामान्यदरम्यान पोलिसांना आणि भारतीय क्रिकेट मंडळाला असे वाटते की झेंड्यांच्या काठ्या एखाद्याला मारण्यासाठी किंवा मैदानाच्या आत फेकण्यासाठी वापरल्या जाऊ शकतात ज्यामुळे कोणत्याही खेळाडूला दुखापत होऊ शकते. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी स्टेडियमच्या आत ध्वज असलेल्या लाठ्या न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

यावेळी 10 संघ आयपीएल खेळत आहेत. या संघांमध्ये मुंबई आणि पुण्यात 70 सामने होत आहेत. मुंबईतील वानखेडे, ब्रेबोन आणि डीवाय पाटील या तीन स्टेडियममध्ये एकूण 55 सामने होणार आहेत. हे सामने पाहण्याकरिता क्रिकेट प्रेमीची मोठी गर्दी होत आहे.

कायदा व सुव्यवस्थेचा संदर्भात महाराष्ट्र पोलीस कलम 33 अनुसार पोलिसांना अनेक अधिकार आहेत. क्रिकेट प्रेमींकडे असलेल्या झेंड्यांना लाठ्या असतात त्या स्टेडियमच्या आत मध्ये घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. या लाठ्याचा उपयोग स्टेडियम मध्ये हिंसाचार करण्याकरिता देखील होऊ शकतो खबरदारी म्हणून स्टेडियममध्ये लाठ्या घेऊन जाण्यास बंदी आहे. मुंबई पोलीस मोर्च्यात पण लाठ्या घेऊन जाण्यास बंदी घालतात असे माजी निवृत्त आयपीएस अधिकारी पि.के जैन यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details