मुंबई -कोरोनाचे रुग्ण मुंबईत दिवसेंदिवस वाढत असून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशाची आर्थिक राजधानी मुंबईत विविध उपाययोजना प्रशासकीय स्तरावर केल्या जात आहेत. राज्यात लॉकडाऊन 31 ऑगस्टपर्यंत वाढवला गेला आहे. लॉकडाऊनमध्ये आतापर्यंत मास्क न वापरणाऱ्या 6 हजार 154 जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
राज्यभरात पोलिसांकडून धडक कारवाई करण्यात येत आहे. लॉकडाऊनमध्ये मुंबई शहरात 20 मार्च ते 26 ऑगस्ट दरम्यान विविध ठिकाणी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 20 हजार 895 प्रकरणात तब्बल 48 हजार 836 नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लॉकडाऊन, संचारबंदी नियमांचे उल्लंघन करुन फरार झालेल्या 8 हजार 168 लोकांचा पोलीस शोध घेत असून तब्बल 19 हजार 120 जणांना पोलिसांनी नोटीस देऊन सोडले आहे. तर 21 हजार 548 जणांना जामिनावर पोलिसांनी सोडून दिलेले आहे.