मुंबई- अमेरिकी नागरिकांना लुबाडणाऱ्या शहरातील कॉल सेंटरवर पोलिसांनी धाड टाकली आहे. या कॉल सेंटरच्या माध्यमातून भारतात प्रतिबंधित औषधींना अमेरिकी नागरिकांना विकण्याच्या नावाखाली त्यांना लुटले जायचे. या गुन्ह्यात समावेश असलेल्या दोन आरोपींना क्राईम ब्रांच युनिट १० च्या पथकाने अटक केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरातील मरोळ परिसरात असलेल्या ए.एम कॉल कनेक्ट या कॉल सेंटर कंपनीच्या माध्यमातून अमेरिकेतील ग्राहकांशी संपर्क साधला जात होता. यावेळी कॉल सेंटरमधील व्यक्ती ही स्वतःला अमेरिकन नागरिक असल्याचे सांगून अमेरिकेतील नागरिकांना वायग्रा, सियलीस, लिव्हेट्रो यासारख्या प्रतिबंधित औषध स्वस्तात विकण्याचे आमिष द्यायचे व ऑनलाईन ऑर्डर घेऊन त्यांच्याकडून पैसे लुबाडायचे.