मुंबई - पीएमसी बँकेचे अध्यक्ष वरियंम सिंग यांच्या अंधेरीतील घराबाहेर ठेवीदारांनी आज (रविवारी) मोठा संताप व्यक्त करत आंदोलन केले. पीएमसी बँक आर्थिक गैर व्यवहारला तीन महिन्याचा कालावधी उलटला आहे. तरीदेखील बँक प्रशासन रिझर्व्ह बँक आणि सरकार कोणतेही पावले उचलत नसल्याने ग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे. ग्राहकांनी आज अंधेरीत बँकेचे अध्यक्ष वरीयम सिंग यांच्या घरावर आंदोलन केले. तसेच त्यांच्या पोस्टरलाही आग लावली.
महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह अँड पंजाब बँकेमध्ये अनिमित आर्थिक व्यवहार झाला. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने या बँकांवर निर्बंध लावले आहेत. या सर्व प्रकाराला जवळपास 3 महिन्याचा कालावधी लोटला आहे. तरीदेखील कोणत्याही खातेदारांला अद्याप पैसे परत मिळाले नाही. कोणत्याही प्रकारची हालचाल होत नसल्याने हवालदिल झालेल्या खातेदारांनी बँकेचे अध्यक्ष वरीयम सिंग यांच्या अंधेरी येथील घरासमोर संताप व्यक्त करत आंदोलन केले.