महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवानला कोरोनाची लागण - राकेश वाधवान कोरोना पॉझिटिव्ह न्यूज

पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवानला कोरोनाची लागण झाली आहे. श्वास घेताना त्रास होत असल्याने वाधवानला मुंबईच्या जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. यात त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. वाधवानवर जी. टी. रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

pmc bank scam accused rakesh wadhawan tests positive for covid-19
पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवानला कोरोनाची लागण

By

Published : Jul 14, 2020, 1:14 PM IST

मुंबई -पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवानला कोरोनाची लागण झाली आहे. श्वास घेताना त्रास होत असल्याने वाधवानला मुंबईच्या जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. यात तो पॉझिटिव्ह ठरला. वाधवानवर जीटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

राकेश वाधवान पॉझिटव्ह ठरल्यामुळे, आता आर्थर रोड कारागृहातील राकेशच्या संपर्कात आलेल्या ६ जणांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. ज्यात राकेश वाधवान याचा मुलगा व पीएमसी बँक घोटाळ्यातील सहआरोपी सारंग वाधवान याचाही समावेश आहे.

छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर जून महिन्यात राकेश वाधवान याला जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 6 जुलै रोजी श्वास घेण्यास त्रास होत असल्या कारणाने त्याची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्याचा अहवाल 10 जुलै रोजी आला. त्यात तो पॉझिटिव्ह आढळला. यानंतर त्याला मुंबईतील जीटी रुग्णालयात कोरोनावरील उपचारांसाठी हलवण्यात आले आहे.

पीएमसी बँकेकडून घेण्यात आलेले ४ हजार ३५५ कोटी रूपयांचे कर्ज थकविल्याप्रकरणी ऑक्टोबर २०१९ मध्ये राकेश वाधवान व सारंग वाधवान या पिता-पुत्रास अटक करण्यात आली आहे. या घोटाळ्या प्रकरणी मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा व ईडी यांनी तपास करून पीएमसी बँकेचे संचालक व एचडीआयएलच्या संचालकानाच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

हेही वाचा -'श्रीमंत आणि गरीब भेदभाव नको; अमिताभ प्रमाणे गरिबांवरही खासगी रुग्णालयात उपचार करा'

हेही वाचा -अर्ध्या महाराष्ट्राची तहान भागवणारे मुख्यमंत्री म्हणजे शंकरराव चव्हाण, मधुकर भावेंनी दिला आठवणींना उजाळा

ABOUT THE AUTHOR

...view details