महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पीएमसी बँकेची कागदपत्रे फॉरेन्सिक ऑडिट विभागाकडे; पडताळणी सुरू - फॉरेन्सिक ऑडिट विभाग

पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणी बँकेचे माजी संचालक वारियम सिंग, व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस, एचडीआयएल कंपनीचे राकेश वाधवा व सारंग वाधवा या चौघांना अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान मिळालेल्या कागदपत्रांचा अभ्यास करण्यासाठी ही कागदपत्रे फॉरेन्सिक ऑडिट विभागाकडे पाठवण्यात आली आहेत

बँकेतील ठेवीदार, शंकर कोटियन व त्यांच्या पत्नी मृदुला कोटियन

By

Published : Oct 12, 2019, 2:13 AM IST

मुंबई -अडीच हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी पीएमसी बँकेचे माजी संचालक वारियम सिंग, व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस, एचडीआयएल कंपनीचे राकेश वाधवा व सारंग वाधवा या चौघांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत झालेल्या तपासादरम्यान आर्थिक गुन्हे शाखेला काही कागदपत्रे मिळाली आहेत. कागदपत्रांचा अभ्यास करण्यासाठी ही कागदपत्रे फॉरेन्सिक ऑडिट विभागाकडे पाठवण्यात आली आहेत, अशी माहिती मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

पीएमसी बँकेची कागदपत्रे फॉरेन्सिक ऑडिट विभागाकडे


सारंग वाधवा, राकेश वाधवा यांनी हाउसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्‍चर लिमिटेड (एचडीआयएल) कंपनीच्या नावाखाली पीएमसी बँकेकडून अडीच हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. या पैशांचा वापर त्यांनी मुंबई, अलिबाग, वसई व भारतातील इतर ठिकाणी संपत्ती घेण्यासाठी खर्च केल्याचे तपासादरम्यान समोर आले. आर्थिक गुन्हे शाखेने वाधवा पितापुत्रांची वसई, अलिबाग व मुंबईतील संपत्ती जप्त केली आहे.

हेही वाचा - मुख्यमंत्री आज विदर्भात तर, पवार मराठवाड्यातील या जिल्ह्यात घेणार सभा


वाधवा पिता-पुत्रांनी घेतलेल्या कर्जाचे व्याज-मुद्दलीचा आकडा साडेचार हजार कोटींवर गेल्यानंतर बँकेच्या एमडीने जॉय थॉमस रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे मदत मागितली. आरबीआयकडून पीएमसी बँकेतचे ऑडिट करण्यात आले. या दरम्यान कर्ज स्वरूपात एचडीआयएलला दिलेली रक्कम वेगवेगळ्या खात्यांवर वळवण्यात आल्याचे समोर आले. ही रक्कम कुठल्या पद्धतीने वळवण्यात आली, याचा तपास फॉरेन्सिक ऑडिटच्या माध्यमातून सध्या सुरू आहे.


ठेवीदार हवालदिल -


रिझर्व बँकेने पीएमसी बँकेवर निर्बंध लादल्यानंतर पीएमसी बँकेचे खातेदार हवालदिल झाले आहेत. कंपनीत काम करत असताना झालेल्या अपघातामध्ये शंकर कोटियन हे भाजून जखमी झाले होते. या अपघाताची नुकसान भरपाई स्वरूपात मिळालेला पैसा त्यांनी पीएमसी बँकेमध्ये एफडी ठेवला होता. त्याच्या मुलीच्या लग्नाचा खर्च करण्यासाठी त्यांना त्यांच्या हक्काची रक्कम बँकेतून काढणे मुश्किल झाले आहे. आता मुलीचे लग्न करायचे की आत्महत्या हा प्रश्न आम्हाला पडला आहे, असे मृदुला कोटियन यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details