मुंबई -पीएमसी बँक खातेदारांनी आज मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मुंबई पोलीस आयुक्तांनी पीएमसी बँकेच्या ग्राहकांना आत्तापर्यंत झालेल्या पोलीस तपासाची माहिती दिली.
पीएमसी बँक खातेदारांनी मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांची भेट घेतली पीएमसी बँकेच्या घोटाळ्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींना मुंबईतील दिवाणी न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. एचडीएल कंपनीचा मालक राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि बीएमसी बँकेचा माजी संचालक वरियम सिंग यांना 23 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा- भाजपचे संकल्पपत्र म्हणजे गाजरांचा पाऊस; सुप्रिया सुळेंचा निशाणा
आर्थिक गुन्हे शाखेने पीएमसी बँकेच्या आणखी एक संचालक सुरेंद्र सिंग अरोरा याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. आत्तापर्यंत पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी एकूण चार जणांना अटक झाली आहे. या घोटाळा प्रकरणी 4050 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणाचा 90 दिवसांमध्ये तपास पूर्ण केला जाईल. खातेदारांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले.