महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आमचे पैसे परत द्या; पीएमसी बँकेबाहेर खातेदारांचा ठिय्या

पीएमसी बँकेवर रिझर्व्ह बँकेने आर्थिक अनियमितेमुळे 6 महिने निर्बंध लादल्यानंतर खातेधारक हवालदिल झाले आहेत. यादम्यान खातेधारकांना प्रथम 1 हजार रुपये काढण्याची सवलत देण्यात आली होती. त्यानंतर खातेदारांचा बँकेच्या विविध शाखांमधील संताप पाहून रिझर्व्ह बँकेने यामध्ये वाढ करत 10 हजार रुपये काढण्याची शाखांना सवलत दिली आहे.

पीएमसी बँकेबाहेर खातेदारांचा ठिय्या

By

Published : Sep 29, 2019, 5:37 PM IST

मुंबई- पीएमसी बँकेच्या कामात अनियमितता आढळल्याने बँकेवर रिझर्व्ह बँकेने आर्थिक निर्बंध लावले आहेत. त्यामुळे भांडुप येथील पीएमसी बँकेच्या बाहेर शेकडो खातेधारक 10 हजार रुपये काढण्यासाठी रांगेत उभे आहेत. तर दुसरीकडे या बँकेच्या बाहेर काही खातेधारकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आमचे पैसे परत द्या आणि दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी या खातेधारकांनी केली आहे.

पीएमसी बँकेबाहेर खातेदारांचा ठिय्या

पीएमसी बँकेवर रिझर्व्ह बँकेने आर्थिक अनियमितेमुळे 6 महिने निर्बंध लादल्यानंतर खातेधारक हवालदिल झाले आहेत. यादम्यान खातेधारकांना प्रथम 1 हजार रुपये काढण्याची सवलत देण्यात आली होती. त्यानंतर खातेदारांचा बँकेच्या विविध शाखांमधील संताप पाहून रिझर्व्ह बँकेने यामध्ये वाढ करत 10 हजार रुपये काढण्याची शाखांना सवलत दिली आहे.

हेही वाचा - मनसेत भरती सुरू, विधानसभेसाठी लढवणार 150 जागा

पीएमसी बँकेवर आर्थिक निर्बंध लादल्यावर ग्राहकांमध्ये आपले पैसे सुरक्षित आहेत का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे ग्राहकांनी आपले पैसे बँकेतून काढण्यासाठी रांगा लावल्या आहेत.

हेही वाचा -विक्रोळी मतदारसंघात मोठी चुरस; कोण मारणार बाजी?

ABOUT THE AUTHOR

...view details