मुंबई :पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मेट्रो दोन ए आणि सातचे बटन दाबून उद्घाटन केले जाणार आहे. उद्घाटन सोहळा एमएमआरडीच्या वांद्रे कुर्ला संकुलाच्या मैदानावर केले जाणार आहे. ज्या दुसऱ्या टप्प्यामध्ये उद्घाटन होत आहे. त्यामधील सर्वच रेल्वे स्थानक काही सुरू झालेले नाहीत. परंतु यामध्ये जे रेल्वे स्थानक आहेत. त्यांची नावे म्हणजे वालनी, मालाड, गोरेगाव, पहाडी गोरेगाव, लोअर ओशिवरा, ओशिवरा आणि अंधेरी ही आहेत.
मेट्रो मार्गिका 2अ चा फायदा :नवीन मेट्रो रेल्वे मार्गिका दोन ही अंधेरी मेट्रो रेल्वे स्थानक पश्चिम दिशेस एक या ठिकाणी कनेक्ट होते. त्यामुळे दहिसरवरून या मार्गीकेने अंधेरीला पटकन येता येते. अंधेरीहून घाटकोपरला जाण्यास त्वरित मेट्रो उपलब्ध होते. अंधेरीवरून दादरला किंवा चर्चगेटला देखील वेगाने जाता येऊ शकते. या मेट्रो मार्गीकेचा सर्वसामान्य जनतेला लाभ होणार आहे. मात्र दहिसर आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात राहणारे कामगार जे अंधेरीला कामास येतात त्यांना देखील सोयीचे आहे, असे येथील नागरिकांनी सांगितले.
मेट्रो मार्गीका सात :दहिसर ते बुंदेवाली मेट्रो रेल्वे स्थानकापर्यंत एकूण 14 मेट्रो रेल्वे स्थानके आहेत. मेट्रो दोन ए आणि मेट्रो मार्गीका सात यांची एकूण लांबी 35 किलोमीटर आहे. दहिसर ते ओवरी पाडा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान देवीपाडा ते मागाठाणे पासून, पोईसर तसेच अकुर्ली म्हणजे जिथे महिंद्रा कारखाना आहे. तसेच पुढे कुरार व्हिलेज ते दिंडोशी आणि आरे ते गोरेगाव पूर्व आणि जोगेश्वरी पूर्व ते मोगरा. मोगरा हे मेट्रो रेल्वे स्थानक जोगेश्वरी लोकल रेल्वे स्थानकापासून पूर्वेला साधारण तीन किलोमीटर अंतरावर आहे.