महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उद्धव ठाकरे, पंतप्रधान मोदींची मुंबईत आज संयुक्त सभा

उद्धव ठाकरे आणि मोदी एकमेकांविषयी काय बोलणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. उद्या (शनिवार) जाहीर प्रचाराची सांगता होत असल्याने प्रचाराचा आजचा महत्त्वाचा दिवस आहे.

उद्धव ठाकरे

By

Published : Oct 18, 2019, 8:27 AM IST

Updated : Oct 18, 2019, 9:18 AM IST

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजप-शिवसेनेची संयुक्त सभा आज सायंकाळी ६ वाजता वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यानिमित्ताने एका व्यासपीठावर येत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि मोदी एकमेकांविषयी काय बोलणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. उद्या (शनिवार) जाहीर प्रचाराची सांगता होत असल्याने प्रचाराचा आजचा महत्त्वाचा दिवस आहे.

हेही वाचा -चार हाडांचा बीएमसी चोर कोकणात आला होता - निलेश राणे

उद्धव ठाकरेंनी मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना 370 प्रमाणेच आता सरकारने राम मंदिराचा निर्णयही घ्यावा असे म्हटले होते. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिकमध्ये झालेल्या सभेत उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर नाव न घेता टीका केली होती. मोदी जाहीर सभेत म्हणाले होते की, गेल्या दोन तीन आठवड्यांपासून काही वाचाळवीर लोक राममंदिराविषयी काहीही बरळत आहेत. त्यांनी सर्वोच्च न्यायालयावर आपला विश्वास ठेवायला हवा. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, यावर सुनावणी सुरू आहे, सर्वोच्च न्यायालय सातत्याने वेळ काढून बाबी ऐकून घेत आहे. मग मला कळत नाही, की हे वाचाळवीर लोक कुठून उगवले आहेत? या प्रकरणी ते खोडा का घालत आहेत? आपला सर्वोच्च न्यायालयावर विश्वास असला पाहिजे.

हेही वाचा -'देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी भाजपने गेल्या पाच वर्षांमध्ये काय केले?'

पंतप्रधान मोदींच्या या अप्रत्यक्ष टोल्यावर उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात भाष्य केले होते. राम मंदिर प्रकरणी न्यायालयाने न्याय दिला तर ठीक आहे, नाहीतर मंदिरासाठी विशेष कायदा करा, ही शिवसेनेची मागणी कायम आहे. आम्हाला राजकारणासाठी राम मंदिर नको आहे. ती देशाची आणि हिंदुंची मागणी आहे. प्राण जाए पर वचन ना जाए, हीच शिवसेनेची नीती आहे. आम्ही वचन दिले आहे आणि ते पाळणारच, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.

हेही वाचा -धक्कादायक.. भाजपनंतर आता काँग्रेसचा 'टी शर्ट' घालून तरुणाची आत्महत्या

त्यानंतर आता प्रचाराच्या निमित्ताने हे दोन्ही नेते एका व्यासपीठावर येत असल्याने ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच आज मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातून शिवसेनेने राम मंदिर होणारच असे म्हटले आहे. त्यामुळे राम मंदिराचा विषय सभेमध्ये चर्चिला जाण्याची शक्यता आहे.

Last Updated : Oct 18, 2019, 9:18 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details