मुंबई Mumbai Trans Harbor Link :ट्रान्स हार्बर लिंक रोडचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते 12 जानेवारीला होणार आहे. मुंबईतील शिवडी आणि रायगड जिल्ह्यातील न्हावा शेवा परिसरादरम्यानचा २१.८ किलोमीटर लांबीच्या मार्गामुळं सध्याचा प्रवास वेळ दोन तासांवरून १५-२० मिनिटांपर्यंत कमी होणार आहे, (CM Eknath Shinde) असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारी रोजी MTHL चं उद्घाटन करतील. या मार्गामुळं शहरांचा आर्थिक विकास होईल, असंही शिंदे म्हणाले. (Navi Mumbai) अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, MTHL मार्ग पुढं धमनी येथे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेशी जोडला जाणार आहे. MTHL मार्ग हा 6-लेन सी लिंक आहे. याचा 16.50 किलोमीटरचा भाग समुद्रावर आणि 5.50 किलोमीटर भाग हा जमिनीवरुन जात आहे.
MTHL प्रकल्प 22 किमी लांब : मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा सुमारे २२ किमी लांबीचा प्रकल्प आहे. यात दोन आपत्कालीन मार्गांसह 6 लेन आहेत. हा सी लिंक शिवडी आणि न्हावाला जोडतो. या लिंकवर मुंबईतील शिवडी, नवी मुंबईच्या टोकावरील राष्ट्रीय महामार्ग 4B वरील शिवाजी नगर आणि चिर्ले येथे इंटरचेंजची सुविधा आहेत. MTHL हा प्रकल्प मुंबईतील शिवडी ते नवी मुंबईतील चिर्लेपर्यंत 21.8 किमी लांबीचा आहे.
मच्छिमारांना नुकसान भरपाई मिळाली : एमटीएचएल प्रकल्पामुळं बाधित झालेल्या लोकांचं पुनर्वसन करण्यात आलं आहे. त्याचबरोबर या प्रकल्पामुळं ज्या मच्छिमारांच्या रोजीरोटीवर परिणाम झाला आहे, अशा मच्छिमारांना भरपाई देण्यात आली आहे, असं सरकारकडून सांगण्यात आलंय.