महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 11, 2023, 11:50 AM IST

Updated : Feb 11, 2023, 12:05 PM IST

ETV Bharat / state

PM Narendra Modi : हॅलो मुंबई... म्हणत नरेंद्र मोदींनी पुन्हा मुंबईकरांना दिला आवाज

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल शुक्रवारी मुंबई दैऱ्यात वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. मोदींचा दौरा यशस्वी रित्या पूर्ण झाल्यानंतर त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याला अगेन हॅलो मुंबई...असे कॅप्शन दिले आहे. मुंबईतील सीएसएमटी येथून मोदींनी या एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री देखील यावेळी उपस्थित होते.

PM Narendra Modi
पंतप्रधान मोदी

अगेन हॅलो मुंबई...

मुंबई : पंतप्रधान मोदींनी एक व्हिडीओ अधिकृत फेसबूक पेजवर शेअर केला आहे. ज्याला अगेन हॅलो मुंबई... असे कॅप्शन दिले आहे. आज देशात आधुनिक गाड्या धावत आहेत. मेट्रोचा विस्तार होत आहे. मेट्रो स्टेशन बांधले जात आहेत. भारताच्या इतिहासात प्रथमच दहा लाख कोटी रुपये फक्त पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ठेवण्यात आले. यातही रेल्वेचा वाटा अडीच लाख कोटी रुपयांचा आहे. असे त्यांनी यावेळी नमूद केले. या दोन एक्सप्रेस एकत्र करून वंदे भारत आता 10 मार्गांवर धावत आहे.

स्वप्न पूर्ण करणार : अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळाले असे काही लोकं म्हणतात. महाराष्ट्राला रेल्वेसाठी 13 हजार 500 कोटी रुपये केंद्राने दिले आहेत. ही रक्कम याआधी कधीच मिळाली नाही. राज्यात पहिल्यांदाच ही रक्कम रेल्वेसाठी देण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. रेल्वे मंत्र्यांना मनापासून धन्यवाद देतो व त्यांचे आभार मानतो. मला या गोष्टीचा आनंद आहे की वंदे भारत या दोन्ही ट्रेनचा लोकार्पण करण्यासाठी स्वतः पंतप्रधान मोदी मुंबईत उपस्थित राहिले, असेही शिंदे म्हणाले.

इतर ठिकाणच्या वंदे भारत एक्सप्रेस :यापूर्वी मुंबई-गांधीनगर, नवी दिल्ली-वाराणसी, नवी दिल्ली-श्री माता वैष्णोदेवी कटरा, गांधीनगर-मुंबई, नवी दिल्ली-अंब अंदौरा, चेन्नई-म्हैसूर, नागपूर-बिलासपूर, हावडा-नवी जलपाईगुडी, सिकंदराबाद-विशाखापट्टणम या मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाली आहे. नागरिकांना अधिक सुरक्षित आणि आरामदायी प्रवास मिळाला यासाठी नवीन वंदे भारत ट्रेनमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत.

अर्थसंकल्पामुळे राज्याला फायदा : शिंदे पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या आशीर्वादाने आम जनतेचे सरकार राज्यात स्थापन झाले आहे. समृद्धी महामार्गाचे उद्घाटनही मोदींच्या हस्ते झाले. लाखो लोकं या महामार्गाचा फायदा घेत आहेत. मेट्रो ट्रेनचे उद्घाटनपण तुमच्या हस्ते झाले. त्याचाही लाखो लोक फायदा घेणार आहेत. यापुढेही विविध प्रकल्प आहेत त्याचाही शुभारंभ तुमच्या हस्ते व्हावा यासाठी मी वाट पाहत आहे. यंदाच्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला भरपूर फायदा झाला आहे व यापुढेही तसा सहयोग असावा. आम्ही खूप मेहनतीने व मनापासून काम करू. तुमचे जे स्वप्न आहे तीन ट्रिलियन डॉलर इकॉनोमी ते पूर्ण करण्याबरोबरच महाराष्ट्रातून एक ट्रिलियन डॉलर इकॉनोमी उभी केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे.

वंदे भारतचे दर जाहीर :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (10 फेब्रुवारी) मुंबई-सोलापूर आणि मुंबई-शिर्डी मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. मध्य रेल्वेने मुंबई-सोलापूर आणि मुंबई-शिर्डी मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसचे भाडे दरसुद्धा जाहीर केले आहेत. सीएसएमटी-सोलापूर वंदे भारत ट्रेनमध्ये कॅटरिंग सेवेशिवाय चेअर कारसाठी 1,000 रुपये आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कारसाठी 2,015 रुपये दर असेल तर कॅटरिंगसह सेकंड क्लासचे भाडे अनुक्रमे 1,300 आणि 2,365 रुपये असेल. मध्यरेल्वेच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

हेही वाचा :Vande Bharat Train: वंदे भारत ट्रेनच थाटात शुभारंभ; सोलापूरात प्रवाशांनी व्यक्त केल्या भावना

Last Updated : Feb 11, 2023, 12:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details